शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘बेस्ट सिटी’ होणार ‘एलईडी’ शहर

By admin | Updated: November 8, 2016 01:40 IST

बेस्ट सिटी, स्वच्छ सिटीनंतर पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आता एलईडी दिव्यांचे शहर अशी होणार आहे. ऊर्जाबचतीसाठी एलईडी शहर करण्याचा संकल्प महापालिकेने सोडला आहे

विश्वास मोरे , पिंपरीबेस्ट सिटी, स्वच्छ सिटीनंतर पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आता एलईडी दिव्यांचे शहर अशी होणार आहे. ऊर्जाबचतीसाठी एलईडी शहर करण्याचा संकल्प महापालिकेने सोडला आहे. येत्या तीन वर्षांत हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वाटचाल सुरू आहे. त्यातून ३० टक्के वीजबचत होईल, असा अंदाज महापालिकेने व्यक्त केला आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, उद्याने, रुग्णालये येथील पथदिव्यांवर वर्षाला २२ कोटी रुपये वीजबिलापोटी खर्च होतात. त्यातच महावितरणचे दर हे वाढणारे असल्याने, तसेच समाविष्ट गावांतही मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. नव्याने विकसित झालेल्या मार्गावर पथदिवे बसविण्यात येत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीज बचतीचा प्रयत्न सुरू केला आहे. एलईडी दिव्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वीज बचत होते. त्यामुळे एलईडीचे शहर करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून वीज बचत होण्यासाठी मदत होणार आहे. तीस टक्के वीज बचत होणार आहे. येत्या तीन वर्षांत हा संकल्प पूर्ण होईल. त्यातून बेस्ट सिटी, स्वच्छ शहर आणि आता एलईडीचे शहर अशी ओळख निर्माण होणार आहे.- प्रवीण तुपे, सह शहर अभियंता रिअल टाइम क्लॉकसायंकाळी सहाला सुरू झालेले पथदिवे पहाटे सहापर्यंत सुरू असतात. रात्रभर या दिव्यांचा एकसारखाच प्रकाश असतो. वीज बचतीसाठी रिअल टाइम क्लॉक ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. सायंकाळी सहाला १०० वॉटचा दिवा सुरू होतो. मध्यरात्री १२ ते सकाळी सहा या वेळेत या दिव्याच्या वीज वापरात ५० टक्के बचत होणार आहे, अशी व्यवस्था रिअल टाइम क्लॉकमध्ये केली आहे. तसेच दिवे दुरुस्तीच्या वेळी १०० टक्के वीज वापर होत असे. त्यात आता ७५ टक्के बचत होणार आहे.