शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पोलिसांच्या ‘यंग ब्रिगेड’मुळे झाला नक्षलींचा बीमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:43 IST

महिलांच्याही हाती एके-४७ : धडक अंमलबजावणीचे यश

राजेश निस्ताने ।मुंबई : नक्षलग्रस्त गडचिरोलीत कार्यरत असलेल्या पोलीस दलातील उच्चशिक्षित अधिकाऱ्यांच्या ‘यंग ब्रिगेड’मुळे नक्षलवाद्यांचा खात्मा होत असून या भागातील नक्षली चळवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. महिला पोलीस अधिकारीसुद्धा एके-४७ हाती घेऊन जंगलात नक्षल्यांचा खात्मा करीत आहेत.आजवर गडचिरोलीतील नियुक्ती ही काळ्यापाण्याची शिक्षा समजली जायची. परंतु सरकारने गडचिरोलीत तीन वर्षे सेवा दिलेल्यांना पसंतीच्या ठिकाणी नियुक्ती देण्याचे धोरण आखल्याने येथे नियुक्ती मिळालेले अधिकारी आनंदाने कार्यकाळ पूर्ण करत आहेत. तर २५ टक्के अधिकारी ‘मिशन’ म्हणून स्वत:हून गडचिरोलीत येण्यास उत्सुक असतात. गेल्या पाच वर्षांत शंभरपेक्षा अधिक नक्षलवादी मारले गेले तर ६५० पेक्षा अधिक शरण आले आहेत.आजाराने ग्रासले१नुकत्याच राबविलेल्या दोन मोहिमांमध्ये तब्बल ३७ नक्षलवादी मारले गेले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. नक्षल चळवळीतील ‘बॉस’चे वय ६० वर्षांपेक्षा अधिक असून त्याला विविध आजारांनी ग्रासले आहे. नक्षलींच्या १४ सदस्यीय कोअर कमिटीमध्ये केवळ दोनच सदस्य तरुण आहेत. तर पोलीस अधिकाºयांचे वय सरासरी २५ वर्षे आहे. त्यामुळे विचार क्षमता, गतिमानता यात पोलीस सरस ठरत आहेत.२गत आठवड्यातील मोहिमेत नक्षल्यांचे चार प्रमुख नेते मारले गेले. या चकमकीत नक्षलींची दोन दलम व एक प्लाटून पूर्णता संपली. नेतृत्वाची फळीच गारद झाल्याने नक्षलवादी हादरले आहेत.इंजिनीअर, डॉक्टर, सीए खाकी वर्दीतगडचिरोली जिल्ह्यात ३५० पैकी शंभरावर पोलीस निरीक्षक हे अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे पदवीधर आहेत. तर पाच आयपीएस अधिकाºयांपैकी तीन डॉक्टर, एक चार्टर्ड अकाउंटंट व एक एमबीए आहे. शिवाय, नऊ पोलीस उपअधीक्षकांपैकी पाच डॉक्टर आहेत. इंटेलिजन्सचे लोकल नेटवर्क आणि ५८ चौक्यांवरील बीडीडीएसची सक्रियता पोलिसांना अधिक फायदेशीर ठरत आहे.नक्षलविरोधी मोहिमेत तरुण आणि उच्चशिक्षित अधिकारी आहेत. शिवाय, जवानांची शारीरिक तंदुरुस्ती, जोश, मानसिक स्थिती, टायमिंग, अत्युच्च दर्जाचे प्रशिक्षण, अत्याधुनिक शस्त्रे-दारूगोळा, वाहतूक व्यवस्था, कम्युनिकेशन्स, इंटेलिजन्स, नियोजन, सरकार आणि पोलीस मुख्यालयातून मिळणारे पाठबळ आदीमुळे पोलिसांच्या मोहिमा यशस्वी होत आहेत.- बिपीन बिहारी, पोलीस महासंचालक(कायदा व सुव्यवस्था), मुंबई

टॅग्स :naxaliteनक्षलवादी