शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भासाठी बार्टीचे उपकेंद्र स्थापन होणार !

By admin | Updated: July 28, 2016 19:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विदर्भासाठी खास उपकेंद्र तयार होणार आहे. समता प्रतिष्ठान नावाने स्थापन होणाऱ्या या केंद्राचा प्रस्ताव नागपूर विद्यापीठाकडून आला

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी) चे विदर्भासाठी खास उपकेंद्र तयार होणार आहे. समता प्रतिष्ठान नावाने स्थापन होणाऱ्या या केंद्राचा प्रस्ताव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून आला आहे. बार्टीच्या पुणे येथील केंद्राप्रमाणे विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी सर्व उपक्रम येथून राबविण्यात येणार आहेत. यासाठी ५० कोटीच्या जवळपास खर्च येणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक राजेश धाबर्डे यांनी पत्रपरिषदेत दिली.

बार्टी कौशल्याविकास, संशोधन, प्रशिक्षण, जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण उपक्रम राबविते. परंतु यासाठी बार्टीच्या पुणे येथील केंद्राकडे अप्रोच व्हावे लागते. विदर्भात मोठ्या संख्येने समाजसुधारकांवर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. बार्टीच्या विविध उपक्रमांचा विदर्भातील विद्यार्थी लाभ घेत आहे. त्यामुळे विदर्भातच बार्टीचे उपकेंद्र सुरू करण्याचा विचार आहे. विदर्भ हे दलित चळवळीचे प्रेरणास्थान असतानाही येथे दलित रंगभूमीची चळवळ फार प्रभावी ठरू शकली नाही. दलित रंगभूमीला अप्रत्यक्षरीत्या बळ देण्याचा बार्टीचा प्रयत्न आहे.

बार्टीच्या माध्यमातून सांस्कृतिकदृष्ट्या राबविण्यात येणाऱ्या अभियानात दलित रंगभूमीला संधी देण्याचा बार्टीचा प्रयत्न आहे. बार्टीकडे महाड स्मारकाची जबाबदारी आली आहे. येथे फाईव्हस्टार निवासी संशोधन केंद्र सुरू करण्याचा तसेच महाड स्मारकाला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याचा बार्टीचा मानस आहे. त्यावर जवळपास आठ कोटीचा खर्च होणार आहे. बार्टीतर्फे अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित महिलांवर संशोधन करण्यात येणार आहे.

शिक्षणाचा या महिलांना काय फायदा झाला, त्यांचा विकास झाला का याचा डाटा गोळा करणार आहे. त्याचबरोबर घरकामगार महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट पुणे येथे सुरू आहे. पुढच्या वर्षात जवळपास १० हजार महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे राजेश ढाबरे यावेळी म्हणाले