शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ कारागृह प्रशासनालाही, गृहविभागाचा निर्णय

By admin | Updated: July 4, 2016 22:18 IST

आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास आता कारागृह प्रशासनात काम करणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांनाही पोलिसांप्रमाणेच आरोग्य कुटूंब योजनेचा लाभ मिळणार आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 4 - आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास आता कारागृह प्रशासनात काम करणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांनाही पोलिसांप्रमाणेच आरोग्य कुटूंब योजनेचा लाभ मिळणार आहे. दोन दिवसांपूर्वीच गृह विभागाच्या उप-सचिवांनी अशा प्रकारची माहिती देणारे परिपत्रक संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुखांना पाठविले आहे. परिणामी संबंधितांना दिलासा मिळाला आहे. अपघात झाला अथवा एखादा गंभीर आजार उद्भवल्यास मोठ्या रक्कमेच्या वैद्यकीय खर्चाचा भार कसा सोसावा, असा प्रश्न संबंधितांना पडतो. शासनाच्या विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांना विविध योजनांनुसार आरोग्य योजनेचे कवच असल्याने त्यांना फारशी अडचण भासत नाही. मात्र, अनेक विभागात काम करणा-यांना त्याचा लाभ मिळत नसल्याने संबंधितांची मोठी कुचंबना होते. अशीच कुचंबना कारागृह प्रशासनात काम करणा-या अधिकारी, कर्मचा-यांच्याच्या वाट्याला आली आहे. ती ध्यानात घेत गृहविभागाने पोलिसांप्रमाणेच कारागृहात काम करणा-या गणवेषधारी तुरूंगाधिकारी, कारागृह रक्षकांनाही आरोग्य कुटूंब योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. २ जुलैला या निर्णयाचे परिपत्रक गृहविभागाचे उपसचिव जयसिंग पावरा यांनी संबंधित विभागप्रमुखांना पाठविले आहे. ५० लाखांची तरतुदया निर्णयानुसार, आरोग्य कुटूंब योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने ५० लाखांची तरतुद केली आहे. अंमलबजावणीचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह) यांना राहणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली आहे. आरोग्य कुटूंब योजनेचा लाभ मिळणार असल्याचे कळाल्याने शेकडो संबंधित कुटुंबीय सुखावले आहेत. ---