शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन विद्यापीठाद्वारे बोगस पदव्यांची खैरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:43 IST

आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी नावाने आॅनलाइन बोगस विद्यापीठ स्थापन करून ‘वाजवी दरात’ पीएच.डी.पासून हवी ती पदवी देण्याचा गोरखधंदा उघड झाला आहे

साहिल शहा कोरेगाव (जि. सातारा) : आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी नावाने आॅनलाइन बोगस विद्यापीठ स्थापन करून ‘वाजवी दरात’ पीएच.डी.पासून हवी ती पदवी देण्याचा गोरखधंदा उघड झाला आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील बड्या हस्तींनी या खैरातीचा लाभ घेत बोगस पदव्या घेतल्या आहेत.हा सर्व फंडा राबवणारा तथाकथित कुलपती डॉ. विठ्ठल श्रीरंग मदने (५० रा. कोरेगाव, जि. सातारा) याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.कोरेगावसारख्या छोट्या शहरांत १० बाय १०च्या खोलीत इंटरनेटद्वारे आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी चालविली जात होती. मदने हा स्वत: अल्पशिक्षित असून त्यानेही विविध संस्था व विद्यापीठांकडून अनेक बोगस पदव्या घेतल्या होत्या. पीएच.डी. केल्याची बतावणीही तो करीत होता. त्याच्या या आॅनलाइन बोगस कामाचा पसारा पाहून तपास यंत्रणादेखील चक्रावून गेली आहे.स्वत:कडे एकही कागद न ठेवता सर्वच कामकाज आॅनलाइन पद्धतीने केल्याने तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविलीआहे.मदने हा स्वत: कुलपती बनून २८० प्रकारच्या बोगस पदव्यांचे वाटप करीत होता. खैरात केलेल्या पदव्यांमध्ये सर्वाधिक पदव्या या ‘डॉक्टर इन फिलॉसॉफी’च्या (पीएच.डी. व मानद पीएच.डी.) आहेत. त्यांची संख्या जवळपास १९४ एवढी आहे. त्याखालोखाल डॉक्टर इन लिटलेचर (डीलिट)चा क्रमांक लागत असून, त्याची संख्या ८६ एवढी आहे.पदव्यांच्या लाभार्थ्यांची यादी त्याने बेवसाईटवरूनच पोलिसांना काढून दिली आहे. या लाभार्थ्यांची केवळ नावे असून, त्यांचे पत्ते नसल्याने तपासात अडचणी येत आहेत.मदने याने बेवसाईटवर स्वत:च्या नावापुढे कुलपती ही पदवी लावून, मोबाइल क्रमांकदेखील दिला होता. त्याद्वारे लोकांनी संपर्क साधल्यावर बेवसाईटवर असलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास तो सांगत होता. एका पदवीसाठी कमीतकमी ५० हजारांचा दर सांगितला जायचा. पदवीदान सोहळ्यात व्यक्तींसोबत येणाऱ्या इतरांकडून मात्र मिळेल ती रक्कम खिशात टाकून तो पदव्या द्यायचा.बड्या हॉटेलांमध्येपदवीदान सोहळासाताºयातील प्रसिद्ध हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये होणाºया पदवीदान सोहळ्यांना तो संबंधितांना बोलावून घ्यायचा. एकाच हॉटेलवर भर न देता, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळी हॉटेल्स बुक केली जात होती.