शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

मानाने बाजूला व्हावे

By admin | Updated: July 12, 2015 03:37 IST

मी कधीही कुठल्या संस्थेमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतलेले नाही, पण एवढे नक्कीच कळते की विद्यार्थ्यांना नको असेल तर त्या स्वत:हून पदापासून बाजूला व्हावे, असा अप्रत्यक्ष सल्ला

नानाचा सल्ला : एफपीआय प्रकरण

पुणे : मी कधीही कुठल्या संस्थेमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतलेले नाही, पण एवढे नक्कीच कळते की विद्यार्थ्यांना नको असेल तर त्या स्वत:हून पदापासून बाजूला व्हावे, असा अप्रत्यक्ष सल्ला अभिनेता नाना पाटेकर याने एफटीआयआयच्या (फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया) नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना दिला.त्याचबरोबर आपण संस्थेमध्ये शिकण्यासाठी आलो आहोत, आंदोलन करण्यासाठी नव्हे; त्यामुळे वेळ निष्कारण वाया घालवू नका... यात तुमचेच नुकसान आहे, असे सांगत आमच्या काळात कुठल्या शिक्षकाने कान पिळावा, हे आम्हाला कधी ठरवता आले नाही, अशी टिप्पणीही त्याने केली.चौहान यांच्यासह नियामक मंडळावर नियुक्त करण्यात आलेल्या इतर सदस्यांची नियुक्ती देखील रद्द करावी, या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सर्वस्तरावरून पाठिंबा मिळत आहे. अनुपम खेर, ऋषी कपूर, रणबीर कपूर, अमोल पालेकर यांच्यानंतर आता नाना पाटेकर यानेही विद्यार्थ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवीत चौहान यांनाच मानाने बाजूला होण्याचा सल्ला दिला आहे. नाना म्हणाला, चौहान यांना मी ओळखत नाही. ‘महाभारता’तले युधिष्ठिर, कर्ण, दुर्योधन वगैरे पात्र मी स्वत:च स्वत:मध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘महाभारत’ मालिका कधीच पाहिली नाही. मुळात कुठल्यातरी पक्षाची आहे, म्हणून एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते, असे मला वाटत नाही. गुलजार किंवा अमिताभ बच्चन यांना डावलून गजेंद्र चौहान यांना अध्यक्षपदावर बसविण्यात आले हे म्हणणे तर मूर्खपणाच आहे. कारण बच्चन आणि गुलजार आपल्या कामात एवढे व्यस्त आहेत, की त्यांना यासाठी द्यायला वेळ आहे असे वाटत नाही, असे नानाने स्पष्ट केले. आयुष्यात भूक, दारिद्र्य, अवेहलना हेच शिक्षक माझ्या वाट्याला आले. त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले, अशी वेदना सांगत, विद्यार्थ्यांनी फार ताणू नये. विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शिकता आले पाहिजे, यामध्ये विद्यार्थ्यांचेच नुकसान अधिक होणार असल्याची कळकळही त्याने व्यक्त केली.