शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत उपचार घेत असलेल्या इमानचे घटले 262 किलो वजन

By admin | Updated: April 11, 2017 23:21 IST

सध्या मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इमान अहमद अब्दुल्लती हिचे वजन सुमारे 262 किलोंनी

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 11 - तब्बल 500 किलोहून अधिक वजनामुळे चर्चेत आलेल्या आणि सध्या मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इमान  अहमद अब्दुल्लती हिचे वजन सुमारे 262 किलोंनी घटल्याची माहिती इमानवर उपचार करणारे डॉक्टर मुफज्जल लकडावाला यांनी सांगितले. आज आयोजित करण्यात आलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात डॉ. लकडावाला यांना वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. त्यावेळी इमानला भारतात आणण्यासाठी आणि तिच्यावर उपचार करताना आलेल्या अनुभवांबाबत बोलताना डॉ. लकडावाला यांनी ही माहिती दिली.  
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.   या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप पाडणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांना गौरविण्यात आले. या सोहळ्यात डॉ. लकडावाला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर लोकमत वृत्तसमूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी इमानवर उपचार करताना आलेल्या अनुभवांचे कथन करण्याचा आग्रह लकडावाला यांना केला. 
त्यावेळी लकडावाला म्हणाले, "गेल्या वर्षी  इमानवरील उपचारांसाठी तिच्या बहिणीने माझ्याकडे संपर्क साधला. त्यावेळी तिने काही इमानची काही छायाचित्रे आणि व्हिडिओसुद्धा पाठवले. ते पाहून मला तिची दया आली. त्यानंतर मी उपचार करून तिला वाचवण्याचे ठरवले. पण हे आव्हान सोपे नव्हते. जवळपास 25 वर्षे घरातून बाहेर न पडलेल्या आणि पाच फूट उंच व 4 फूट रुंदीच्या इमानला खिडक्या तोडून बाहेर आणावे लागले. तिच्या रक्तचाचण्यांचे अहवालही  चिंता वाढवणारे होते. पण सुदैवाने महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र पोलीस विमनतळ आणि सैफी रुग्णालयाने मदत केली. आज इमान उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्याचाच परिणाम म्हणून इमानच्या वजनात 262 किलोंनी घट झाली आहे,  
 
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर च्या चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" आणि  वैद्यकीय यामधील 14 जणांना आणि  स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .   
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.  
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.  
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा