शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या खात्यातून पैसे चोरणारा बेल्जिअम नागरिक जेरबंद

By admin | Updated: April 16, 2017 03:06 IST

ग्राहकांच्या एटीएम कार्डचा डाटा चोरी करुन त्यांच्या खात्यातून पैसे काढणाऱ्या बेल्जिअम नागरिकाचा पर्दाफाश करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे.

मुंबई : ग्राहकांच्या एटीएम कार्डचा डाटा चोरी करुन त्यांच्या खात्यातून पैसे काढणाऱ्या बेल्जिअम नागरिकाचा पर्दाफाश करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. अलकान्डो मिख्यालो (४०) असे त्याचे नाव असून त्याला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.जूहू येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये सोनेरी रंगाचे बनावट एटीएम कार्ड सापडले होते. कोणीतरी खातेदारांचा डाटा चोरी करुन पैसे काढत असल्याच्या तक्रारीही बँकेकडे आल्या. त्यानुसार १ एप्रिलला सायबर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी एटीएम मशीनचा डाटा आणि सीसीटीव्ही आधारे केलेल्या तपासणीत विदेशी नागरिक पाच ते सहा गोल्डन प्लास्टीक कार्डचा वापर करून ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे चोरी करत असल्याची माहिती उघडकीस आली. त्यानुसार तपास सुरू असताना आरोपी अंधेरीच्या विक्रोळी - लिंक रोड परिसरातील एका इमारतीमध्ये राहत असल्याचे समोर आले. ोलिसांनी शुक्रवारी रात्री सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून दोन गोल्डन प्लास्टीक कार्डसह लॅपटॉप, हार्डडिस्क, इंटरनेट डोंगल, मोबाईल, एक पेन ड्राईव्ह, बनावट एटीएम कार्ड आणि ५९ हजार ९०० रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. त्याने अनेकांच्या खात्यातून पैसे काढल्याचा संशय असून त्याची चौकशी सुरू असल्याचे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी) एक वर्षाच्या पर्यटक व्हीसावर मुंबईत२०१४ मध्ये परदेशी नागरिक पर्यटक व्हीसावर मुंबईत आला होता. त्यानंतर तो पुन्हा मायदेशी निघून गेला. मुंबईत भाड्याने राहणाऱ्या या पर्यटकाने घरमालकाला दीड लाख रुपये भाडे दिले होते. तो सोनेरी प्लास्टीक कार्डच्या आधारे मुंबईकरांच्या बँक खातेदारांचा एटीएम कार्डचा डाटा चोरी करून एटीएममधून पैसे काढत असल्याचे तपासात समोर आले.८ बनावट एटीएम कार्ड जप्तआरोपीकडून चोरी केलेल्या ५९ हजार ९०० रुपयांच्या रोख रकमेसह एक लॅपटॉप, तीन हार्डडीस्क, चार इंटरनेट डोंगल, तीन मोबाईल एक पेन ड्राईव्ह आणि आठ बनावट एटीएम कार्डस जप्त केली आहेत.