शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव महापौर-उपहापौरांवर राजद्रोहाचा ठपका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 06:01 IST

बेळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर यांना कर्नाटक शासनाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर महापालिका बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर यांना कर्नाटक शासनाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर महापालिका बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौर, उपमहापौर यांना बजावलेल्या नोटिशीत राजद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे, कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा बेळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबतचा अहवाल मागविला आहे.‘काळा दिना’नंतर कर्नाटक सरकारने उत्तर कर्नाटक प्रादेशिक आयुक्तांकडून संपूर्ण घटनेचा अहवाल मागविला आहे. कर्नाटक राज्योत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी न होता आपण ‘काळ्या दिना’च्या सायकल फेरीत सहभागी होऊन राजद्रोह केला आहे. त्यामुळे आपल्या विरोधात कारवाई का केली जाऊ नये, तसेच महापालिका नियमित बैठका का घेतल्या नाहीत, अशी विचारणा महापौर-उपमहापौरांना दिलेल्या कारणे दाखवा नोटिशीत करण्यात आली आहे.‘काळा दिना’च्या सायकलफेरीत महापौर सरिता पाटील, उपमहापौर संजय शिंदेंसह एकूण २८ नगरसेवक सहभागी झाले होते. त्यापैकी ९ नगरसेवकांवर कारवाई केली जावी, अशी मागणी कानडी संघटना करीत आहेत. राज्य सरकार फक्त महापौर, उपमहापौरांवर कारवाई करतील. अन्य ९ नगरसेवकांवर कारवाई करतील का, संपूर्ण महापालिकाच बरखास्त करतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)