बेळगाव : बेळगाव शहराच्या नामांतर विरोधात आज, गुरुवारी ‘बेलगाम बिलाँग्ज टू महाराष्ट्र’ संघटनेतर्फे बेळगावच्या उपमहापौरांना जाब विचारण्यात आला. त्यांची भूमिका जनतेसमोर येऊन त्यांनी मांडवी तसेच ‘बेळगावी’ म्हणून लिहिलेल्या सरकारी वाहनांचा त्यांनी त्याग करावा अन्यथा तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा देण्यात आला. संघटनेच्या वतीने अध्यक्ष पीयूष हावळ, बेळगाव प्रभारी सागर मुतकेकर, उपप्रभारी इंद्रजित धामणेकर, निखिल रायकर, कार्यवाहक अभिषेक तरळे, संघटक प्रवीण रेडेकर, आशुतोष कांबळे, मंगेश पाटील, संदीप बोंगाळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बेळगावी नामांतर केलेल्याच्या विरोधाचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. महापौर पालिकेत नसल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. बेळगाव शहराचे नामांतर ‘बेळगावी’ करण्यात आले असतानादेखील मराठी भाषिक महापालिकेत सीमाप्रश्नांचा ठराव मांडला नाही तसेच शहराच्या नामांतरालादेखील विरोध केला नाही. त्यामुळे ‘बेळगावी’ नामांतराला विरोध करावा, अशी मागणी ‘बेलगाम बिलाँग्ज टू महाराष्ट्र’ या फेसबुक संघटनेने केली आहे.
बेळगावच्या नामांतरविरोधात विचारला उपमहापौरांना जाब
By admin | Updated: January 9, 2015 00:47 IST