शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडामालकांनी महामार्ग रोखला

By admin | Updated: January 30, 2017 02:47 IST

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, अशी आग्रही मागणी करीत बैलगाडामालकांनी मंचर शहरातून निषेध मोर्चा काढत पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी रास्ता रोको केले

मंचर : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, अशी आग्रही मागणी करीत बैलगाडामालकांनी मंचर शहरातून निषेध मोर्चा काढत पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी रास्ता रोको केले. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पक्षविरहित आंदोलन करून शर्यत तातडीने सुरू करा, अशी एकमुखाने मागणी केली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.आंबेगाव तालुक्यातील बैलगाडामालक रविवारी एकवटला होता. बैलगाडामालकांच्या आंदोलनासाठी जथ्थेच्या जथ्थे मंचरच्या दिशेने येत होते. शिवाजी चौकात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ््याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. बैलगाडा, बैलगाड्यांचे बैल घेऊन शेतकरी आले होते. घोषणांचे फलक हातात घेऊन तरुण, वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते. हजारोंचा जमाव अत्यंत शिस्तीने मोर्चामध्ये सहभागी झाला होता. लक्ष्मी रस्तामार्गे मोर्चा एसटी बसस्थानकाजवळ आल्यावर त्याचे रूपांतर सभेत झाले. आंबेगाव तालुका बैलगाडा संघटनेने या आंदोलनाचे आयोजन केले होते.या वेळी वळसे-पाटील, आढळराव पाटील यांच्यासह जयसिंग एरंडे, बाळासाहेब टेमगिरे, बाळासाहेब आरूडे, रामकृष्ण टाकळकर, विकास थोरात, स्नेहल पोखरकर यांनी मनोगत व्यक्त केले.पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बैलगाडामालकांनी रस्त्यावर ठाण मांडले. बैलगाडा शर्यत सुरू करा, पेटा संस्थेवर बंदी आणा, अशा घोषणा देण्यात आल्या. नायब तहसीलदार यांना खासदार आढळराव पाटील, तसेच दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. आंदोलन संपल्यानंतर काही क्षणात महामार्ग मोकळा करून देण्यात आल्याने वाहतूक लगेच सुरळीत झाली. या आंदोलनात सहभागी झालेला बैलगाडा आकर्षणाचा विषय होता. अनेकांनी या बैलगाड्यासोबत फोटो काढून घेतले. विशाल तोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. आंदोलनाचे नियोजन के. के. थोरात, सुहास बाणखेले, संतोष मोरडे, राजू आरूडे, दत्ता गांजाळे, दत्ता थोरात, राजू निघोट, बाबू बोऱ्हाडे, मयूर वाबळे यांनी केले.