शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कलाकार बनणे फार कठीण

By admin | Updated: November 25, 2014 00:53 IST

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात कलाकार बनणे ही फार कठीण गोष्ट आहे. गुरूची शिकवण, कलेप्रती समर्पण, साधना आणि व्यक्तिमत्त्वावर चांगला कलाकार ठरविता येतो. शिक्षण आणि व्यक्तिमत्त्वाचा

जगविख्यात सतारवादक बुद्धादित्य मुखर्जी नागपूर : शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात कलाकार बनणे ही फार कठीण गोष्ट आहे. गुरूची शिकवण, कलेप्रती समर्पण, साधना आणि व्यक्तिमत्त्वावर चांगला कलाकार ठरविता येतो. शिक्षण आणि व्यक्तिमत्त्वाचा समन्वय यानेच ती व्यक्ती पूर्ण कलाकार बनते असे मत जगविख्यात सतारवादक बुद्धादित्य मुखर्जी यांनी व्यक्त केले.लोकमत समूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यवतमाळ येथे आयोजित संगीत सुमनांजली या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या मुखर्जी यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. ५९ वर्षीय मुखर्जी यांनी भारत तसेच जगातील लाखो संगीत रसिकांना सतारवादनाने मंत्रमुग्ध केले आहे. एक चांगला कलाकार बनण्यासाठी कष्ट आणि संयमाची आवश्यकता असते. गुरूच्या सहवासात शिक्षण ग्रहण करण्यासोबतच प्रतिभेला पैलू पाडण्यासाठी २५ ते ३० वर्ष लागतात. हे एखाद्या तपस्येसारखेच आहे. उत्कृष्ट कलाकार बनण्याची ही पहिली अट असते. या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. फारच कमी लोक इतका संयम ठेवू शकतात असे ते म्हणाले. देशात प्रतिभावान कलाकारांची कमतरता नाही. शास्त्रीय संगीतात तर येथे प्रतिभेची काहीच कमी नाही. फक्त आवश्यकता आहे ती दडलेल्या प्रतिभांना ओळखून त्यांना जगासमोर आणण्याची असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले. मी पाच वर्षांच्या वयापासून सतार शिकायला सुरुवात केली. याची प्रेरणा मला माझे वडील आचार्य पं.बिमलेन्दु मुखर्जी यांच्यापासून मिळाली. ते स्वत: उच्च दर्जाचे सतारवादक होते. ते माझे गुरूदेखील होते. आमच्या घरी त्या काळात २४ तास संगीत रहायचे. मी त्याचे श्रवण करायचो. माझ्या वडिलांपासूनच मी सतारवादनाच्या बारीक बाबीदेखील शिकलो. १३ व्या वर्षी मी पहिल्यांदा एकट्याने कार्यक्रम सादर केला. जबलपूर येथील एका कार्यक्रमात मी माझ्या वडिलांसोबत पोहोचलो होतो. लोकांनी माझे वादन ऐकले आणि या मुलाचे आम्ही वेगळे वादन ऐकू इच्छितो अशी मागणी केली. वादन शिकण्याच्या प्रक्रियेत मी कधी कलाकार झालो हे मला कळलेच नाही असे मुखर्जी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अभियंता ते संगीत साधकसंगीताची शिकवण घेत असतानाच मी अभ्यासदेखील सुरू ठेवला होता. रायपूर अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘मेटॅलर्जिकल’ शाखेत मी पदवी मिळवली. संगीत हे मला फार जवळचे आहे. त्यामुळेच मी माझ्या पदवीला घरी ठेवून दिले आणि संगीताची साधना सुरू ठेवली. चित्रपटांमध्ये सतारीचा उपयोग फार कमी झाला आहे. स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्या काळात संगीतामध्ये याचा खूप उपयोग करण्यात यायचा असे मत मुखर्जी यांनी व्यक्त केले.