शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जवानांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 07:01 IST

विविध पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची सभापतींची माहिती

मुंबई : लष्करातील जवान आणि त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरूवारी विधान परिषदेत केली. शिवाय, परिचारक यांचे निलंबन तसेच विधिमंडळ परिसरातील प्रवेश बंदीही मागे घेण्यात आली आहे. विविध पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सभापतींनी स्पष्ट केले.जवानांच्या कुटंबियांबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे परिचारक यांच्यावर २०१७ साली निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याबाबत नेमलेल्या उच्चाधिकार समितीच्या अहवालानंतर २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा ठराव सभागृहात संमत करण्यात आला होता. यावर शिवसेनेसह विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला. होता निलंबन मागे घेतल्यानंतर शिवसेनेकडून थेट परिचारक यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव मांडला होता. सभापतींनी या प्रस्तावावरील निर्णय राखून ठेवला होता. आज गटनेत्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. परिचारक यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत जवानांची आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली आहे. त्यामुळे साकल्याने विचार करत बडतर्फीचा प्रस्ताव फेटाळत असल्याचे सांगतनाच परिचारक यांना विधिमंडळ आणि सभागृहातील प्रवेश बंदी उठविण्यात आल्याचे सभापतींनी स्पष्ट केले. त्यामुळे परिचारक यांना आता सभागृहातील कामकाजात भाग घेता येणार आहे.

टॅग्स :Prashant Paricharakप्रशांत परिचारक