शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

परिचारक यांची बडतर्फी मागे; रावतेंनी मागितली सभापतींची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 06:08 IST

परिचारक यांनी दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान विरोधकांवर टीका करताना सीमेवर तैनात जवानांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते.

मुंबई : सैनिकांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह विधानामुळे निलंबित करण्यात आलेले भाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांची बडतर्फी मागे घेतल्याच्या कारणावरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सभागृहात गोंधळ घातला. शिवाय, सभापतींच्या दालनात जाऊन असभ्य भाषा वापरली. मात्र, बडतर्फीवर दिला नसल्याचे समजताच रावतेंनी सभापतींची माफीही मागितली.

परिचारक यांनी दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान विरोधकांवर टीका करताना सीमेवर तैनात जवानांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानानंतर देशभर संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. या विधानाची दखल घेत त्यांना विधान परिषदेतून दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. गेल्या वर्षी त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले, परंतु शिवसेना आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत त्यास विरोध केला होता. शिवसेना गटनेते अनिल परब यांनी परिचारक यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

सभापतींनी या प्रस्तावावरील निर्णय राखून ठेवतानाच परिचारकांच्या सभागृह प्रवेशावरील बंदी कायम ठेवली होती. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परिचारक यांना विधानभवनाच्या प्रांगणात येण्यास परवानगी मिळावी, यासाठी भाजपा आमदारांनी सभापतींना पत्रे पाठवली होती. त्याची माहिती देत आज विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनिल परब यांनी दिलेला परिचारकांच्या बडतर्फीचा प्रस्ताव अस्वीकार्य असल्याचे सांगितले. याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र गोंधळामुळे सभापती नेमके काय म्हणाले हे सदस्यांना नीट ऐकू न गेल्याने शिवसेनेसह काँगेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आक्रमक होत संताप व्यक्त केला. सभापतींच्या निवेदनाबाबत गैरसमज झाल्याने रावते दालनात जाऊन अद्वातद्वा बोलले.मुंडे करणार होते सभापतींची तक्रारसभापतींनी बडतर्फीची सूचना फेटाळताच शिवसेना आणि विरोधी बाकांवरील सदस्य आक्रमक झाले. या गदारोळात सभापतींची पुढील घोषणा ऐकली गेली नाही. सभापतींनी निलंबनच मागे घेतल्याचा समज झाल्याने सदस्य आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभापती आणि भाजपाचा निषेध केला. सभापतींचा निषेध करतानाच पक्षश्रेष्ठींच्या कानावर हा विषय घालणार असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले.