शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील मांसविक्री बंदी घेतली मागे

By admin | Updated: September 12, 2015 02:25 IST

मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याचा अर्थ मांस खाण्यावर बंदी आहे, असा होत नाही. आम्ही नागरिकांच्या किचनमध्ये घुसून त्यांना मांस खाण्यास बंदी केलेली नाही

मुंबई : मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याचा अर्थ मांस खाण्यावर बंदी आहे, असा होत नाही. आम्ही नागरिकांच्या किचनमध्ये घुसून त्यांना मांस खाण्यास बंदी केलेली नाही, अशी भूमिका राज्य शासनाने शुक्रवारी उच्च न्यायालयात मांडली. वाढता जनक्षोभ लक्षात घेता महापालिकेने मुंबईतील मांसविक्री बंदी मागे घेतल्याचे न्यायालयाला सांगितले.पालिकेने १३ व १८ सप्टेंबर रोजी तर १० व १७ सप्टेंबर रोजी शासनाने मांसविक्रीवर बंदी घातली आहे. पालिकेने बंदी मागे घेतल्याने आता १७ सप्टेंबरच्या बंदीचा प्रश्न शिल्लक आहे. याच दिवशी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी मांसविक्री बंदी ठेवावी की उठवावी, या विषयी येत्या सोमवारी न्या. अनुप मेहता व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. या प्रकरणी मटण डिलर असोसिएशनने मांसविक्री बंदीविरोधात याचिका केली आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता ही बंदी लागू करण्यात आली आहे. हे गैर असून ही बंदी रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने शासनाला व पालिकेला चांगलेच फटकारले. ज्येष्ठ वकील नरेंद्र वालावलकर यांनी पालिकेने ही बंदी मागे घेतल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली. (प्रतिनिधी)न्यायालयाचे सवालमटण विक्रीवर बंदी आहे. मग मासे व अंडी यावर बंदी का नाही? मासे विक्री म्हणजे त्यांना ठार मारणे होत नाही का? व अंडी मांसाहारात येत नाही का? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. त्यावर हंगामी अ‍ॅडव्होकेट जनरल अनिल सिंह म्हणाले, मासे पाण्याबाहेर काढल्यानंतर ते मृत होतात. त्यांना ठार केले जात नाही. राज्य शासनाने मांसविक्रीवर बंदी आणली आहे. शासनाने लोकांच्या किचनमध्ये घुसून त्यांना मांस खाण्यास बंदी घातलेली नाही.