शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सभेतील बायोमेट्रिक हजेरीला अखेर सुरुवात

By admin | Updated: August 4, 2016 00:53 IST

महापौर प्रशांत जगताप यांनी बायोमेट्रिक पद्धतीने नोंद करून अखेर बुधवारपासून बायोमेट्रिक हजेरीला सुरुवात करण्यात आली

पुणे : महापालिका मुख्य सभा हजेरीची महापौर प्रशांत जगताप यांनी बायोमेट्रिक पद्धतीने नोंद करून अखेर बुधवारपासून बायोमेट्रिक हजेरीला सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेतील ९२ नगरसेवकांनी आतापर्यंत बायोमेट्रिक हजेरीसाठी बोटांचे ठसे प्रशासनाकडे दिले आहेत, त्यांची हजेरी त्यानुसार नोंदविण्यास सुरुवात झाली आहे.परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने ४ निकषांच्या आधारे नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक तयार केले. त्यामध्ये मुख्य सभेला उपस्थिती किती होती, वॉर्डस्तरीय निधी कशावर खर्च केला, सभागृहात किती लेखी प्रश्न विचारले, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याच्या आधारे त्यांनी त्यांचे निष्कर्ष नोंदवले. नगरसेवकांनी रजिस्टरवर सह्या करून नोंदवलेल्या उपस्थितीच्या आधारे परिवर्तन संस्थेने त्याची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांची मुख्य सभेला ७० टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरसेवकांच्या मुख्य सभेची उपस्थिती बायोमेट्रिक हजेरीनुसार नोंदविण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी माननीयांना त्यांच्या बोटाचे ठसे प्रशासनाकडे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. नगरसचिव कार्यालयाने त्यासाठी तीन ते चार वेळा विशेष शिबिरांचे आयोजन केले. त्यांच्या पाठपुराव्यानंतर ९२ नगरसेवकांचे ठसे प्रशासनाला प्राप्त झाले. मात्र, उर्वरित ६० माननीयांना त्यांच्या बोटांचे ठसेच प्रशासनाकडे न नोंदविल्याने बायोमेट्रिक हजेरी प्रत्यक्षात येऊ शकली नव्हती. मात्र, ज्यांनी बायोमेट्रिकसाठी संमती दिली, तितक्यांची हजेरी बायोमेट्रिकने घेण्याचा निर्णय महापौरांनी घेतला.>मुख्य सभेला उपस्थित न राहता नगरसेवकांकडून रजिस्टरवर सह्या केल्या जात असल्याने अनेक प्रकार यापूर्वी उघडकीस आले होते. शहरात सर्व शासकीय कार्यालये, खासगी संस्था यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्यात येते. अगदी महापालिकेतीलही सर्व अधिकारी व कर्मचारी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदवितात.