शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला

By admin | Updated: April 22, 2015 00:29 IST

मडुरा येथील घटना : ४० विद्यार्थी गंभीर जखमी, मुख्याध्यापकांना पालकांचा घेराव

बांदा : मडुरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांवर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मधमाशांनी शाळेतच विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याने ४० विद्यार्थी जखमी झाले. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे मधमाशांनी हल्ला केल्याचा आरोप करत पालकांनी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीपाद पणशीकर यांना घेरावो घालत जाब विचारला. जखमी विद्यार्थ्यांवर बांदा आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.मडुरा प्रशाळेत नववीच्या विद्यार्थ्यांचे दहावीसाठी जादा अभ्यासिका वर्ग सुरू आहेत. सकाळी वर्ग सुरू होता. खोलीच्या इमारतीलाच खिडकीलगत मधमाशांचे पोळे आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनाला ते काढून टाकण्याविषयी सूचना केली होती. मात्र, व्यवस्थापनाने कानाडोळा केला होता.अभ्यासिका संपल्यानंतर मुले घरी जाण्यासाठी बाहेर पडत असताना मधमाशांचे मोहोळ उठल्याने त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. तब्बल ४० विद्यार्थ्यांना मधमाशांनी चावा घेतला. काही विद्यार्थ्यांनी लगतच्या जंगलाचा आसरा घेतला.२२ जखमी विद्यार्थ्यांना पालकांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. इतरांना बांद्यात खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी विद्यार्थ्यांवर उपचार केलेत. (प्रतिनिधी)जखमी झालेले विद्यार्थीस्वाती शिवदास गवंडे (वय १५, रा. निगुडे), निकिता मंगेश कोरगावकर (वय १५, रा. निगुडे), अक्षता राजाराम नाईक (वय १५, रा. इन्सुली), मंदाकिनी सुनील आरोसकर (वय १५, रा. शेर्ले), अमिषा दशरथ मळगावकर (वय १५, रा. शेर्ले), श्वेता शत्रृघ्न तुळसकर (वय १५, रा. निगुडे), प्रियांका सत्यवान राणे (वय १४, रा. निगुडे), रोशन जयराम गवंडे (वय १५, रा. निगुडे), श्रध्दा ज्ञानेश्वर यादव (वय १५, रा. शेर्ले), सुजाता संजय धुरी (वय १५, रा. शेर्ले), सुप्रिया संजय धुरी (वय १५, रा. शेर्ले), सिमिता ज्ञानेश्वर धुरी (वय १५, रा. शेर्ले), समृध्दी सुदन धुरी (वय १५, रा. शेर्ले), मनाली बाळा गावडे (वय १५, रा. निगुडे), नटेश्वरी दत्ताराम पवार (वय १५, रा. निगुडे), अर्पिता अशोक अमरे (वय १५, रा. पाडलोस), बस्तॅव फास्कू फर्नांडीस (वय १५, रा. रोणापाल), वासुदेव मुकुंद गावडे (वय १५, रा. निगुडे), अरुण चिंदरकर ( वय १५, रा. मडुरा) मुख्याध्यापकांना घेरावप्रशाळेच्या इमारतीवर असलेले मधमाशांचे पोळे धोकादायक असल्याने हे पोळे काढण्याविषयी पालकांनी वेळोवेळी सूचना करूनही शाळा व्यवस्थापनाने पोळे न काढल्याने विद्यार्थ्यांना नाहक मधमाशांचा हल्ला सहन करावा लागला. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात प्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीपाद पणशीकर यांना पालकांनी घेराव घालत जाब विचारला. आपण हलगर्जीपणा केल्याने व बेजबाबदार वागल्याने ही घटना घडल्याचा आरोप पालकांनी केला. यावेळी पणशीकर यांनी आपली चूक मान्य करत पालकांची माफी मागितली. यावेळी निगुडे सरपंच आत्माराम गावडे, उपसरपंच जयराम गवंडे, ग्रामपंचायत सदस्य झेवियर फर्नांडीस, रोणापाल उपसरपंच उदय देऊलकर, पाडलोस माजी उपसरपंच लक्ष्मण कुडतरकर, दीपक गोेवेकर, शत्रृघ्न तुळसकर आदिंसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.