शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे कर्मचा-यांवर मधमाशांचा हल्ला!

By admin | Updated: February 17, 2017 02:55 IST

पूर्णा नदीवरील रेल्वे पुलावर घडली घटना; जखमींना अकोला व अकोट येथे हलविले.

अकोला, दि. १६- मार्ग परिवर्तनाच्या कामासाठी अकोला-अकोट मीटरगेज रेल्वे मार्ग १ जानेवारीपासून बंद करण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी ३.३0 च्या सुमारास गांधीग्रामच्या पूर्णा नदीवरील रेल्वे पुलावरून साहित्याची ने-आण करणार्‍या १५ रेल्वे कर्मचार्‍यांवर मधमाशांनी हल्ला चढविला. यात गंभीर जखमी झालेल्या १२ जणांना अकोला सर्वोपचारमध्ये, तर उर्वरित तिघांना अकोट येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.मार्ग परिवर्तनासाठी बंद करण्यात आलेल्या अकोला-खांडवा रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनास प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात अकोला-अकोटदरम्यानच्या रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. सर्वप्रथम उगवा, गांधीग्राम व पाटसूळ जवळ रेल्वे पूल उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाचा एक भाग म्हणून गुरुवारी द. मध्य रेल्वेचे १५ कर्मचारी रेल्वे पूल उभारणीसाठी लागणार्‍या साहित्याची ने-आण करीत होते. दरम्यान, पूर्णा नदीवरील रेल्वे पुलावरून जात असताना अचानक उठलेल्या पोळातील मधमाशांनी रेल्वे कर्मचार्‍यांवर हल्ला चढविला. पुलाच्या मध्यभागी ह्यइकडे आड तिकडे विहीरह्ण अशी परिस्थिती झालेली असताना सर्वांनी जीव मुठीत धरून धाव घेतली. यात घटनेतील गंभीर जखमी झालेले गौरव गौतम, डी. संतोषकुमार, राजेश दौलत, रवींद्र इंगळे, जितेंद्र बैरवा, धनराज, कैलाशचंद्र मीणा, भवरलाल मीणा, आकाश प्रल्हाद, शेख जाफर शेख मस्तान व सुबोध कुमार यांना अकोला सर्वोपचारमध्ये, तर आदित्य मुकुंद गायकवाड, प्रशांत व अमिन शेख बेबा या तिघांना अकोट येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.