शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या आनंदवनात जुळणार एचआयव्हीबाधितांच्या रेशिमगाठी

By admin | Updated: April 28, 2017 14:10 IST

एचआयव्हीसारखा दुर्धर आजार जडल्याने नातेवाईकांसह समाजाने झिडकारलेल्या मुलीला बीडच्या इन्फंट इंडियाने आधार दिला.

ऑनलाइन लोकमत 

औरंगाबाद, दि. 28 -  एचआयव्हीसारखा दुर्धर आजार जडल्याने नातेवाईकांसह समाजाने झिडकारलेल्या मुलीला बीडच्या इन्फंट इंडियाने आधार दिला. पोटच्या लेकारांप्रमाणे सांभाळले. एचआयव्हीबाधित असलेलाच जीवनसाथी तिच्यासाठी शोधला. या बाधितांचा विवाह सोहळा महाराष्ट्रदिनी १ मे रोजी आनंदवनात होणार आहे. 

आई-वडिलांच्या निधनानंतर समाजासह नातेवाईकांनी झिडकारलेल्या मानसी व सुप्रिया (नाव बदललेले) दोन सख्ख्या बहिणी साधारण दहा वर्षांपूर्वी बीडच्या आनंदवनात दाखल झाल्या. अशा परिस्थितीत त्यांना ‘इन्फंट इंडिया’ने मायेची ऊब दिली. संचालक संध्या बारगजे व दत्ता बारगजे यांनी या दोघींना आई-वडिलांचे प्रेम दिले. त्यांना शाळेत पाठविले. आता मानसीला १८ वर्षे पूर्ण झाली असून, तिचे दहावीपर्यंत शिक्षणही झाले आहे. सुप्रिया आजही शाळेत जाऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत आहे. 

मानसीचे लग्नाचे वय झाल्याने तिचे हात पिवळे करण्याची जबाबदारी बारगजे दाम्पत्यावर होती. त्याप्रमाणे त्यांनी मुलाचा शोध घेतला आणि एक चांगला जीवनसाथी शोधून त्याच्याशी विवाह लावण्याचा निर्णय घेतला. मानसी ही १ मे रोजी बोहल्यावर चढणार आहे. तिला एक चांगला जीवनसाथी मिळाला असून, तो अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवासी आहे. त्याचे बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले आहे. या दोघांना आशीर्वाद देण्यासाठी मंत्री, माजी मंत्री, प्रशासकीय अधिकारी, राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले असल्याचे दत्ता बारगजे यांनी सांगितले.

संसारोपयोगी साहित्य देणार भेटविविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते हे मानसीला संसारोपयोगी साहित्य भेट देणार आहेत. वऱ्हाडींसाठी चटणी-भाकर हा जेवणाचा मेन्यू असणार आहे. लग्नाचा सर्व खर्च सामाजिक बांधिलकी असणारे लोक उचलणार आहेत.

यापूर्वी चौघींचे कन्यादानयापूर्वी इन्फंट इंडियातील चार मुलींचा विवाह सोहळा आनंदवनात पार पडला आहे. त्यांचे विवाह समाजातील लोकांनी केलेल्या मदतीवरच झालेले आहेत. सध्या या चौघींचे संसार सुखाने सुरू आहेत. यापैकी एका जोडप्याच्या घरी पाळणा हलला आहे. विशेष म्हणजे जन्मलेले हे मूल एचआयव्ही पॉझिटिव्ह नाही. 

कोठे आहे हे आनंदवन?सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर बीडपासून दहा कि.मी. अंतरावर पालीजवळील बिंदुसरा धरणाच्या उंच टेकडीवर हे आनंदवन उभारलेले आहे. येथे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एचआयव्हीबाधित लोक वास्तव्यास आहेत. यामध्ये चार महिला, २७ मुली व २८ मुलांचा समावेश आहे. येथे मुलांसाठी शाळा आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुले रोज बीड शहरात येतात.