शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

भाषा संचालकच नसल्याने मराठीच्या विकासाचे तीनतेरा!

By सचिन लुंगसे | Updated: February 26, 2023 07:53 IST

विविध विषयांचे ३० नवीन परिभाषा  कोश तयार करण्याचे धोरण मराठी भाषा सल्लागार समितीने २०१३ मध्ये आखले असून पहिल्या टप्प्यात १० नवीन परिभाषा कोश तयार करण्याचा शासन निर्णयही झाला आहे.

- सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठी भाषेतील उच्च विद्याविभूषित व अनुभवसंपन्न अशा विद्वान व्यक्तींनी भाषा संचालक हे पद सांभाळले होते. त्यामुळेच १९८५ पूर्वी मराठी अनुवाद व परिभाषा निर्मितीच्या क्षेत्रात प्रचंड काम झाले. विविध विषयांचे कोश व परिभाषा कोश तयार करण्याबरोबरच मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात कायदे निर्मिती करून राजभाषा मराठीचे दालन समृद्ध करण्याचे कार्य या काळात उभे राहिले; मात्र आज अशा नेतृत्वाअभावी भाषा संचालनालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय यंत्रणेचा विकास खुंटला आहे. 

विविध विषयांचे ३० नवीन परिभाषा  कोश तयार करण्याचे धोरण मराठी भाषा सल्लागार समितीने २०१३ मध्ये आखले असून पहिल्या टप्प्यात १० नवीन परिभाषा कोश तयार करण्याचा शासन निर्णयही झाला आहे. परंतु त्यापैकी एकही नवीन परिभाषा कोश गेल्या दहा वर्षांत नव्याने निर्माण झाला नाही. विद्यमान परिभाषा कोशांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही समितीने घेतला होता. त्यापैकी पाच कोशांमध्ये सुधारणा करण्याचे काम २०१४ मध्ये समितीने उपसमित्यांच्या माध्यमातून सुरू केले. त्यानंतरच्या पाचेक वर्षांच्या काळात परिभाषा कोश सुधारणा उपसमित्यांच्या निरंतर बैठका घेऊन या परिभाषा कोशांमध्ये सुधारणा करण्याचे काम व मराठी अनुवादाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न  झाला होता. त्याला नंतरच्या काळात खीळ बसली.

सध्या भाषा संचालनालयाद्वारा जेमतेम एक वर्षात पूर्ण होऊ शकणारे परिभाषा कोशांचे सुधारणेचे कामही रखडले आहे. अपूर्ण असलेल्या शासन व्यवहार कोशात सुलभतेच्या दृष्टीने नव्याने काहीही भर न घालता पूर्वी केलेल्या कामास सुलभतेचे नाव देण्याचा प्रयत्न करून शासनाची दिशाभूल केली जात आहे.  हा कोश प्रसिद्ध न होताच, त्याचा ॲपमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रस्तावित ३० नवीन परिभाषा कोशांपैकी एकही कोश गेल्या तीन वर्षांमध्ये हाती घेतला गेलेला नाही. परिणामी कोणतेही मूलभूत स्वरूपाचे काम आज भाषा संचालनालयात घडताना दिसत नाही. दुसरीकडे शासन व्यवहारात मराठीचा वापर करण्यासाठी जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकरणांचा मराठीत अनुवाद करण्याचे काम देखील रेंगाळले आहे. (पूर्वार्ध)

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी  करण्याचे लक्ष्य अग्रक्रमाने शासनाने समोर ठेवले आहे.  राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा इंग्रजी मसुदा मराठी अनुवादासाठी प्राप्त झाल्यानंतर शिक्षणासारख्या महत्त्वाच्या व व्यापक जनहिताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मराठी अनुवाद सुमारे दीड वर्षे होऊनही पूर्ण होऊ शकलेला नाही.  हे महत्त्वाचे धोरण मराठीमध्ये उपलब्ध नसल्याने साहजिकच ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन धोरणासारख्या महत्त्वाच्या प्रकरणाचा मराठी अनुवाद देखील गेल्या ८ ते १० महिन्यांपासून प्रलंबित आहे.     कोविडसारख्या महत्त्वाच्या आपत्तीला अनपेक्षितपणे आपल्याला तोंड द्यावे लागले.   नैसर्गिक आपत्ती अचानक उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत आपत्तीच्या प्रसंगी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देणारे महत्त्वाचे धोरण मराठीत उपलब्ध नसणे ही मोठी शोकांतिका आहे.  

टॅग्स :marathiमराठी