शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

शिवसेनेमुळेच मुंंबईत शांतता, सलोखा- खा. राहुल शेवाळे

By admin | Updated: June 12, 2016 20:45 IST

मुंबईत सामाजिक सलोखा, शांतता, अन प्रत्येक घटकाला मानसन्मान मिळत असल्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकर सेनेला प्राधान्य देतील असा विश्वास खा. राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 12 - शिवसेनेमुळे मुंबईत सामाजिक सलोखा, शांतता, अन प्रत्येक घटकाला मानसन्मान मिळत असल्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकर सेनेला प्राधान्य देतील असा विश्वास खा. राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला.आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये सेनेचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी रविवारी ते पंढरपुरात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना खा. शेवाळे म्हणाले की, शिवसेना पक्षाचे ध्येयधोरण आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेसाठी पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवरथाचे आयोजन केले आहे. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून हा शिवरथ १५ ते १९ जूनदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात नेण्यात येणार आहे. गेल्या ५० वर्षांतील शिवसेनेचे सामाजिक कार्य, शिवसेनाप्रमुखांचे विचार, व्यंगचित्रे, लोकाभिमुख योजना या शिवरथाच्या माध्यमातून नागरिकांना दाखविण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला चांगले भवितव्य आहे. आगामी निवडणुकीत सेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे, तालुकाप्रमुख संभाजी शिंदे, शहरप्रमुख संदीप केंदळे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, राहुल पाटील, साईनाथ अभंगराव, धनंजय डिकोळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अस्मिताताई गायकवाड, गणेश वानकर, जिल्हा ग्राहक संरक्षक जिल्हाप्रमुख डॉ. बी. पी. रोंगे, उत्तमप्रकाश खंदारे, समाधान आवताडे, वेताळा भगत, स्वप्नील वाघमारे, बाळासाहेब देवकर आदी उपस्थित होते.