शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेडला यश मिळण्याची शक्यता नसल्याने शेकापमध्ये

By admin | Updated: January 11, 2017 03:51 IST

संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक शाखेचा आजही मी प्रदेश अध्यक्ष असून, संभाजी ब्रिगेड या नव्यानेच स्थापन झालेल्या राजकीय पक्षाला सद्यस्थितीमध्ये राजकारणात यश मिळेल असे वाटत नाही.

पुणे : संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक शाखेचा आजही मी प्रदेश अध्यक्ष असून, संभाजी ब्रिगेड या नव्यानेच स्थापन झालेल्या राजकीय पक्षाला सद्यस्थितीमध्ये राजकारणात यश मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे मी कसलाही डाग नसलेल्या शेतकरी कामगार पक्षात सहभागी होत आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे नेते प्रवीण गायकवाड यांनी मंगळवारी येथे सांगितले.गायकवाड, शांताराम कुंजीर, अजय भोसले, श्रीमंत कोकाटे, यशवंत गोसावी, सारिका भोसले यांच्यासह राज्यातील अनेक कार्यकर्ते तसेच स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, राष्ट्रसेवा समूह या काही संघटना शनिवारवाड्याच्या पटांगणावर गुरुवार, दि. १२ रोजी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. पक्षाच्या चिटणीस मंडळाचे एस.व्ही. जाधव, राजेंद्र कोरडे आदी उपस्थित होते.गायकवाड म्हणाले, सध्याचे राजकारण धनिकांचे झाले आहे. सर्वच पक्ष भ्रष्ट असून विचारांविना स्वैराचार अशीच स्थिती सर्वत्र आहे. शेकाप हा कसलाही डाग नसलेला आणि शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या प्रश्नांवर काम करणारा व देवाच्या आळंदीत स्थापन झालेला पक्ष आहे. त्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी समविचारी प्रतिनिधी  निवडून देऊन कायदे करणे हा आपल्या पक्ष प्रवेशाचा हेतू आहे. ते म्हणाले, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या सत्यशोधक विचारांनी काम करणाऱ्या संघटना असून संभाजी ब्रिगेड हा आज एक ब्रँड असल्याने त्यातून  वेगळा पक्षही निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेडची विचारधारा मानणारे कार्यकर्ते, यापूर्वीचे ७ प्रदेश अध्यक्ष वेगवेगळ्या  पक्षांत आहेत. कार्यकर्ते ज्येष्ठ झाले की  त्यांना अशी मुभा असते. वैयक्तिक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गानुसारच आपण शेकापमध्ये जात  आहोत. या पक्षाला राज्यात बहुजनांचा पक्ष म्हणून, डाव्या विचारांचा पक्ष म्हणून चांगले भवितव्य आहे. (प्रतिनिधी)