शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
2
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
3
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
4
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
5
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
6
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
7
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
8
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
9
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
10
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
11
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
12
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
13
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
14
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
15
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
16
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
17
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
18
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
19
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
20
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?

माझ्यावर परमेश्वराची कृपा होती म्हणूनच बचावलो...

By admin | Updated: August 5, 2015 01:37 IST

परमेश्वराची कृपा म्हणूनच बचावलो, अशी प्रतिक्रिया ‘कृष्णा निवास’ इमारत दुर्घटनेमधून सर्वात आधी म्हणजे अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर

जितेंद्र कालेकर,   ठाणेपरमेश्वराची कृपा म्हणूनच बचावलो, अशी प्रतिक्रिया ‘कृष्णा निवास’ इमारत दुर्घटनेमधून सर्वात आधी म्हणजे अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलेल्या ८० वर्षीय अरविंद नेनेंनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.नौपाड्यातील भारत डेअरीसमोर एक इमारत कोसळली आहे, असा दूरध्वनी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी मंगळवारी पहाटे २.१५ वाजताच्या सुमारास जवाहर बाग अग्निशमन दलाकडे केला. क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झालेल्या जवाहर बाग आणि वागळे इस्टेट अग्निशमन दलातील एस. एस. शिंदे, सुनील चौरे, भगवान भालेराव, मयूर तरे आणि के. एस. पाटील या जवानांनी दुसऱ्या मजल्यावरील नेणे यांना वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला. त्यांनी एका छोट्याशा फटीत रांगत शिरून त्यांच्या अंगावरील तुटलेली खिडकी आणि स्लॅब बाजूला करून त्यांना बाहेर काढले. त्यांच्या मान आणि पायावर मार लागला होता. या दुर्घटनेत नेने हे सर्वात आधी बचावलेले नशीबवान ठरले. त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिका सेवेने ३ वाजून १६ मिनिटांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती स्थिरावल्यानंतर ते म्हणाले, की रोज झोप येईपर्यंत रात्री वाचन करीत असतो. सोमवारी रात्रीही १ ते १.३० वाजतापर्यंत जागा होतो. त्यानंतर साधारण डुलकी लागली, पण अचानक मोठा आवाज झाला. तसे पत्नी माधुरीला हाक मारली. काही समजण्याच्या आतच अंधार झाल्यामुळे तिला दिवाही लावायला सांगितला. नंतर काय झाले ते कळालेच नाही.१९६३ मध्ये बांधकाम झालेल्या या इमारतीमध्ये १९६४ मध्ये ते राहण्यास आले. सात हजार रुपये डिपॉझिट आणि दीडशे रुपये भाडे अजूनही ते सुरू होते. गणपत पाटील या मालकाच्या मुलाकडे ते दिले जायचे. तळमजल्यावर गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये काही तरी बांधकाम सुरू होते. बहुदा त्यामुळेच इमारतीच्या ढाच्याला धक्का बसल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. नेने सोमय्या महाविद्यालयातून निदेशक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांना दोन मुले असून, एक पुण्याला तर दुसरा ठाण्याच्या घोडबंदर रोड येथे वर्षभरापूर्वीच वास्तव्याला गेला. त्यामुळे हे दाम्पत्य एकटेच वास्तव्याला होते. दुर्घटनेत पत्नी माधुरी (७०) हिला गमावल्याचे मात्र त्यांना कळालेले नव्हते. त्यांना बाहेर काढले, त्या वेळीही ते तिचे नाव घेत होते.