शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

बीडमध्येही तब्बल साडेपाच कोटी रोखीने काढले!

By admin | Updated: July 6, 2015 02:03 IST

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम व व्यवस्थापकीय संचालक यांनी मोबाईलवरुन दिलेल्या आदेशावरुन पाच व्यक्तींनी तब्बल ५ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये बँकेतून रोखीने काढले होते.

शिरीष शिंदे, बीडसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम व व्यवस्थापकीय संचालक यांनी मोबाईलवरुन दिलेल्या आदेशावरुन पाच व्यक्तींनी तब्बल ५ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये बँकेतून रोखीने काढले होते. या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन व्यवस्थापकासह इतरांवर दोन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला़ मात्र, बँकेतून पैसे काढणाऱ्या ह्यत्याह्ण पाच व्यक्तींची नावे महामंडळाकडे उपलब्ध असूनही त्यांचा आरोपींमध्ये समावेश का करण्यात आला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे़साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळतील विवरण पत्रात कोट्यावधी रुपये काढल्याचा तपशील दिनांक निहाय आहे. बीड शहरातील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेच्या विकास महामंडळाचे ६००३२६८३८४४ या क्रमांकाचे खाते आहे. या खात्यातून महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम व व्यवस्थापकीय संचालक एस.के. बावणे यांनी मोबाईलवरुन आदेश दिल्याचे जिल्हा व्यवस्थापक सीक़े़ साठे यांनी विवरण पत्रात नमूद केले आहे़ १३ मे २०१४ रोजी औरंगाबाद येथील सतनाम अ‍ॅटोमोबाईल्सला आर.टी.जी.एस.द्वारे ही रक्कम रोखीने देण्याचे आल्याचे उघडकीस आले आहे़ तत्कालीन व्यवस्थापक एल.पी. घोटमुकले व बी.एम. नेटके असताना ही रक्कम महामंडळाच्या एनएसएफडीसी योजनेर्तंगत दिली गेली होती. हा अपहार उघडकीस आल्यानंतर तत्कालीन व्यवस्थापक घोटमुकले, नेटके, लिपीक श्रावण हातागळे, सचिन कांबळे यांच्या विरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात ९ मे २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला असून, त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे तर बी.एम. नेटके यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला़ मात्र, तो होऊ शकला नाही.महामंडळाच्या निधीतून जिल्हा कार्यालयामार्फत बेकायदेशीरपणे वितरीत करण्यात आलेली रक्कम एकाचवेळी व्याजासह भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतेही कागदपत्रे, दस्तावेज न देता कर्ज देण्यात आले असल्याने नोटीस बजावली आहे. ज्यांनी कर्ज घेतले नाही त्यांचे जबाब ठाण्यात घेतले जात आहे. बँकेतून पैसे काढणाऱ्या व्यक्ती महामंडळाशी संबंधित नाहीत. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे- सी.के. साठे, जिल्हा व्यवस्थापक, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, बीडयांना वाटली रोखीने खिरापतलक्ष्मण मरीबा वाघमारे, माणिक निवृत्ती वैरागे, रहीम (वाहन चालक), नितीन भिवाजी लोखंडे व लखन केरबा कसबे या पाच जणांना मे ते डिसेंबर २०१४ या कालावधीत ५ कोटी ७३ लाख ७५ हजार ५०२ रुपये देण्यात आले.