शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांनो, दूषित पाण्यापासून सावधान!

By admin | Updated: July 2, 2016 02:40 IST

पावसाच्या सुरुवातीलाच दूषित पाण्यामुळे मुंबईकर आजारी पडल्याचे दिसून आले आहे.

मुंबई : पावसाच्या सुरुवातीलाच दूषित पाण्यामुळे मुंबईकर आजारी पडल्याचे दिसून आले आहे. काविळीमुळे वडाळा येथील पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या कॉलरा, गॅस्ट्रोच्या आजाराचे रुग्णही जून महिन्यात आढळून आले. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर विशेष लक्ष द्या, असे आवाहन महापालिकेने केले आहे. वडाळा येथील ५ वर्षांच्या मुलाला काविळीच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने या मुलाला १७ जून रोजी कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. २२ जून रोजी या मुलाचा मृत्यू झाला. जून महिन्यात कावीळचे एकूण १६६ रुग्ण आढळून आले आहेत. तर, जून २०१५मध्ये कावीळचे ९९ रुग्ण होते. गॅस्ट्रोचे जून महिन्यात ९७९ रुग्ण आढळून आले आहेत. तर कॉलराचा १ रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीलाच साथीच्या आजारांचा आलेख चढता असल्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेने केला आहे.(प्रतिनिधी) >हेपिटायटिसचा असा होतो संसर्ग हेपिटायटिस विषाणूंमुळे होतो. पण, त्याचबरोबर संसर्ग आणि टॉक्सीकमुळेही हेपिटायटिस होऊ शकतो. हेपिटायटिसचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ हे प्रमुख पाच विषाणू आहेत. ‘ए’ आणि ‘ई’ विषाणूचा संसर्ग हा दूषित पाणी आणि अन्नामुळे होतो. अस्वच्छतेमुळे या विषाणूंचा संसर्ग होतो. हेपिटायटिय ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ या विषाणूंचा संसर्ग रक्त आणि रक्तातील घटकांमधून संक्रमित होतो. वापरलेल्या सुईचा पुन्हा वापर करणे, शरीरसंबंधातून हे विषाणू संक्रमित होतात. हेपिटायटिसपासून बचाव करण्यासाठी हे उपाय करा शारीरिक स्वच्छता राखा, शौचालयात जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुवा, जेवण तयार करण्याआधी, जेवण्याआधी हात स्वच्छ धुवा, स्वच्छ पाणी प्या, उघड्यावरचे अथवा अन्य कोणत्याही ठिकाणी साठवून ठेवलेले पाणी पिणे टाळाअन्न शिजवल्यावर झाकून, स्वच्छ जागी ठेवा, पालेभाज्या, सलाड स्वच्छ धुऊन घ्या, घरी शिजवलेले अन्न खा, रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाणे टाळा (चायनीज भेळ, पाणीपुरी इत्यादी.)गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावीपावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कावीळ होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात गर्भवती महिलांनी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर खाण्याच्या सवयींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. नॉशिया, उलट्या अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.