शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार राहा, उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

By admin | Updated: June 19, 2016 21:42 IST

स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार राहा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 -  स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार राहा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे. युती तोडण्याची आमची इच्छा नाही. लाट निघून गेल्यानंतर गोटेही उघडे पडतात आणि लाटेत ओंडकेही तरंगत असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी मित्र पक्ष भाजपवर केली आहे. शिवसेनेच्या स्थापनेला  ५० वर्ष पूर्ण होत असल्यानं गोरेगाव येथील एनएससी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेनं आतापर्यंत लाखो शिवसैनिक जोडले आहेत. सेना संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत, अस म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. 
 
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे
शिवसेनेच्या मातीत जन्म झाला हे भाग्य
मेळाव्याला येताना पाऊस आला. भिजवून टाकलं हे शुभचिन्ह 
आज महाराष्ट्र भगव्या रंगाने न्हाऊन निघालाय
ज्या मातीत शिवराय, बाळासाहेब जन्मले, तिथे जन्मलो, हे भाग्य
आपलेच विरोधक आपल्या अंगावर आले आहेत 
शिवरायांचा इतिहास ऐकून नुसतं थंड बसायचं का ?
बाहेरच्या विरोधकांपेक्षा, आपलेच जास्त विरोधक झालेत 
शिवसेनेनं गुंडगिरी केली असती तर सेना 50 वर्षं टिकली नसती
माझ कौतुक केलं जातं, ६३ आमदार आणले, मी शून्य आहे, 
मी फक्त तुम्हाला ताकदीची जाणीव करून दिली, हे तुमच यश ! 
आणीबाणीत 'मार्मिक'च्या छापखान्याला टाळं लागलं होतं, आणीबाणीचा सेनेलाही फटका 
बंगालच्या लोकांनी दिल्लीश्वरांना नमवलं
बाळासाहेबांनी सांगितलं, तेच ममता बॅनर्जींनी सांगितलं,
"मां, माटी, मानूष!"  बंगालीबाबूंना धन्यवाद, दिल्लीश्वरांना पराभूत केलंत
विधानसभेच्या वेळी थोडा वेळ मिळाला असता तर चित्र उलटवून दाखवलं असतं 
शिवसेनेने अनेक लाटा झेलल्या आहेत
शिवसेना संपवणारे फक्त लाटेतच फडफडतात 
संकटाच्या काळात धावून शिवसेनेचा वाघच येतो
मुंबई आणि मुंबईतले हिंदू शिवसेनेने वाचवले
मुंबई पेटली तेव्हा धावून आला तो शिवसैनिकच 
आम्ही सत्तेसाठी कधी लाचार झालो नाही, 
सत्तेसाठी वेडीवाकडी तडजोड केली नाही
शिवसेनेची भविष्यात एकहाती सत्ता आणून दाखवेन
काश्मिरी पंडितांना न्याय का मिळत नाही? 
शिवसेनाप्रमुखांनी मुंबईत राहून काश्मिरी पंडितांना तेव्हा आधार दिला
राम मंदिर, समान नागरी कायदा या घोषणांचं काय झालं ? 
कुठे गेले होते राष्ट्रीय पक्ष जेव्हा शिवसेनाप्रमुख काश्मीर पंडितच्या सोबत उभे होते
आम्ही सत्तेमागे कधीच धावलो नाही
उत्तर प्रदेशमधल्या कैरोनामध्ये भाजपला हिंदूंचं स्थलांतर का रोखता येत नाही 
हिंदुत्वाची मतं फुटू नये, या वेड्या आशेपायी आम्ही इतर राज्यात लढलो नाही
सिंह मागे वळून पाहतो, मात्र वाघ मागे वळून पाहत नाही
राज्यातही तेच झालं, पण आता फेरविचार केला पाहिजे
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर मग अपक्षाच्या प्रचारालाही गेलं पाहिजे
एकाच वेळी निवडणुका घेतल्यास परदेश दौऱ्यावरून यावे लागणार नाही
निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जाऊ नये
पवारसाहेब, आमचं आणि भाजपचं आम्ही बघून घेऊ
महागाई नियंत्रणात आणा, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
देश बदलला ही भाजपची घोषणा फसवी. 
महागाई, सीमेवरील सुरक्षेत काहीच बदल झाला नाही
अनेक पंतप्रधान झाले, मुख्यमंत्री झाले, नेते झाले पण हिंदुहृदयसम्राट एकच
'देश बदल रहा है', पण परिस्थिती बदलली नाही
देशातली परिस्थिती अजूनही तशीच आहे देश बदलेला नाहीये
अच्छे दिन माहीत नाही, पण किमान समाधानाचे दिवस तरी आणा 
युती करायची की नाही ते मी ठरवेन. 
आपल्याला आपल्या ताकदीवर निवडणुका जिंकण्याची तयारी ठेवावीच लागेल
आगामी महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही माहीत नाही 
आम्हाला युती तोडायची अजिबात इच्छा नव्हती
युती केल्यास स्वाभिमानाने करू, लाचार होऊन तुमच्या मागे धावणार नाही
दिवाकर रावते आणीबाणीत हातगाडीवरून मार्मिक घेऊन जात होते
शिवसेनेनं आतापर्यंत लाखो शिवसैनिक जोडले
सेना संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले
लाटेत ओंडके तरंगतात
लाट निघून गेल्यानंतर गोटेही उघडे पडतात
आमची रिजनल पार्टी असली तर ओरिजनल आहे
शिवसेनेची एकहाती सत्ता मी उद्या आणून दाखवेन
स्वतःला सिंह म्हणवून घेणारे 93च्या दंगलीत कुठे होते ?
टीका करत नाही जे सत्य आहे ते बोलतो
वाघ कधीच मागे वळून बघत नाही, तो पुढेच चालतो
सिंह कळपात फिरतो, वाघ एकटाच असतो
युतीचं काय होणार हे माहीत नाही
वेडीवाकडी युती करणार नाही
सत्तेसाठी लाचारी पत्करणार नाही
युती केल्यास स्वाभिमानानं करू
युती तोडण्याची आमची इच्छा नाही
स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार राहा