शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

‘नंबर वन होऊ या’

By admin | Updated: January 13, 2017 04:26 IST

भाजपा कार्यकारिणीने ज्या पद्धतीने नगरपालिका निवडणुकीत काम करून पक्षाला राज्यात नंबर वन केले, त्याच पद्धतीचे काम

ठाणे :भाजपा कार्यकारिणीने ज्या पद्धतीने नगरपालिका निवडणुकीत काम करून पक्षाला राज्यात नंबर वन केले, त्याच पद्धतीचे काम करून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीतही भाजपालाच नंबर वन करायचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून, या निवडणुकांना सामोरे जाऊन नंबर वन होऊ या, असे आवाहन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठाण्यात कार्यकर्त्यांना केले.भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवारी ठाण्यातील टिपटॉप येथे पार पडली. यावेळी ज्या सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याला स्व. जयवंतीबेन मेहता सभागृह नाव दिले होते. यापूर्वी ठाण्यात १९९२ मध्ये भाजपा कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यानंतर, आता सुमारे २५ वर्षांनंतर ही बैठक होत आहे. असे असले, तरी ठाणे जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला असून, या जिल्ह्याने रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे अशांसारखे दिग्गज लोकसभेला दिले, तर जगन्नाथ पाटील, वसंत पटवर्धन, अरविंद पेंडसे आदींनीदेखील महत्त्वाचे योगदान दिल्याच्या इतिहासाला उजाळा दिला. नोटाबंदीच्या निर्णयानंतरही राज्यातील जनतेने भाजपाला कौल देत, तब्बल ७२ नगराध्यक्ष आणि १२०० नगरसेवक निवडून दिले. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे १५ वर्षांत केवळ स्वप्नच काँग्रेसने पाहिले, परंतु त्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले ते भाजपा सरकारनेच. इंदू मिलची जागादेखील देण्याचे काम भाजपा सरकारने केले ओबीसींसाठी स्वतंत्र महामंडळ व स्वतंत्र मंत्रालय असावे, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार, मंत्रालय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हिणवणाऱ्यांना टोलाजे जातीयवादी म्हणून भाजपाला हिणवत होते, त्यांनीदेखील आमच्याबरोबर एकाच ताटात खरकटे खाल्ले होते, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लगावला.