शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

भाषा समृद्धीसाठी कटिबद्ध राहा

By admin | Updated: February 28, 2017 02:47 IST

मराठी भाषेच्या समृद्धी आणि संवर्धनाकरिता प्रत्येक मराठी माणसाने कटिबद्ध असणे आवश्यक आहे.

अलिबाग : मराठी भाषेच्या समृद्धी आणि संवर्धनाकरिता प्रत्येक मराठी माणसाने कटिबद्ध असणे आवश्यक आहे. मराठी भाषेत स्वीकृत झालेल्या अन्य भाषेतील शब्दांचा वापर अट्टाहासाने टाळणे म्हणजे मराठीचे संवर्धन असा चुकीचा समज मात्र करून घेवू नये. ‘एसटी’ हे इंग्रजीमधील संक्षिप्त शब्दरूप आज सर्व स्वीकृत झाले आहे, ते बदलण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन माजी प्राचार्य व साहित्यिक अनंत केशव देवघरकर यांनी केले आहे.परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून एसटीच्या राज्यातील सर्व आगारांमध्ये तसेच विभागीय कार्यालयांमध्ये वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने अलिबाग एसटी आगारात आयोजित कार्यक्रमात साहित्यिक अनंत केशव देवघरकर बोलत होते. रायगड जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर म्हणाले, मराठी भाषेचे महत्त्व अल्प वेळात सांगणे कठीण आहे. मराठी भाषा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, केवळ देशातच नव्हे तर परदेशातही अभिमानाने बोलली जाते. मराठी भाषा आपली भाषा म्हणून तिचा वापर आपण अधिकाधिक करणे आवश्यक आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या माध्यमांमध्ये देखील मराठी भाषेला प्राधान्य दिल्यास आधुनिक माध्यमातून मराठी समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अलिबाग एसटी आगार व्यवस्थापक गजानन पाटील यांनी मराठी साहित्याच्या वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमास आगारातील अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रायगड जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, अलिबाग एसटी आगार व्यवस्थापक गजानन पाटील आदी उपस्थित होते.रायगड जिल्ह्यातील ८ एसटी आगार व रामवाडी(पेण)येथील विभागीय कार्यालय अशा सर्व ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती रामवाडी(पेण) विभागीय कार्यालयातील वाहतूक नियंत्रक संजय हर्डीकर यांनी दिली.>आगारात कार्यक्रमरायगड जिल्ह्यातील ८ एसटी आगार व रामवाडी(पेण)येथील विभागीय कार्यालय अशा सर्व ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती रामवाडी(पेण) विभागीय कार्यालयातील वाहतूक नियंत्रक संजय हर्डीकर यांनी दिली आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना पाटील यांनी केले.