शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! हे लोक आत्महत्या करू शकतात

By admin | Updated: January 4, 2017 01:51 IST

काम होत नाही म्हणून तुम्ही सरकारला आंदोलनाचा इशारा दिला असेल, तर तुमचे नाव मंत्रालयाबाहेरच्या लिस्टमध्ये लागू शकते. गृहविभागाने सध्या ३७ जणांची यादी लावली आहे.

मुंबई : काम होत नाही म्हणून तुम्ही सरकारला आंदोलनाचा इशारा दिला असेल, तर तुमचे नाव मंत्रालयाबाहेरच्या लिस्टमध्ये लागू शकते. गृहविभागाने सध्या ३७ जणांची यादी लावली आहे.‘सावधान! हे लोक इथे येऊन आत्महत्येचा वा आत्मदहनाचा प्रयत्न करू शकतात,’ अशी इशारावजा सूचना देत मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ३७ जणांच्या नावांची यादी लावून पास काउंटरवर पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. मंत्रालय परिसरात लावण्यात आलेल्या यादीमध्ये महिलांचाही समावेश आहे. शिवाय, काही जणांचे फोटोही लावले आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये माधव कदम या शेतकऱ्याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आत्महत्या केल्यानंतर आता पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून मंत्रालय पोलीस कक्षाने सतर्कतेचा हा नवा फंडा काढला आहे. आत्महत्या / आत्मदहनाचा प्रयत्न करण्याची मनोवृत्ती असलेल्या काही व्यक्तींची नावे या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली आहेत. प्रवेश पास तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेही ती यादी देण्यात आली आहे. या यादीतील कोणीही पास घ्यायला आले तर सतर्क व्हा, त्यांचे काय काम आहे, त्यांना कोणाला भेटायचे आहे याचा बारीकसारीक तपशील घ्या आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा, असे बजावण्यात आले आहे. ‘आम्ही आत्महत्येचा कोणताही प्रयत्न करणार नाही,’ असे लिहून देणाऱ्यांना आत सोडले जाते. राज्य गुप्तचर विभाग, विविध जिल्ह्यांची पोलीस अधीक्षक कार्यालये आदी यंत्रणांकडून मंत्रालय पोलीस कक्षाने मंत्रालयात येऊ शकतील आणि ज्यांच्यामध्ये आत्महत्येची प्रवृत्ती आहे अशा व्यक्तींची नावे मागविली आणि अशा ३७ नावांची यादी लावली आहे. (विशेष प्रतिनिधी) आंदोलकांचा बंदोबस्त!- काम होत नाही म्हणून अनेक जण सरकारला आत्मदहनाचा इशारा देत असतात. मार्च २०१६ मध्ये नांदेडच्या माधव कदम या शेतकऱ्याने मंत्रालय परिसरात विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर फडणवीस सरकारवर जोरदार टीका झाली. आता मंत्रालय परिसरात पुन्हा अशी घटना होऊ नये आणि सरकार टीकेचे धनी होऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.सेवाहमी कागदावरच! फडणवीस सरकारने ‘आपलं सरकार’च्या माध्यमातून नागरिकांना सेवाहमीचा (राइट टू सर्व्हिस) अधिकार दिला असला तरी तो कागदावरच आहे. लोकांची कामे होण्यास अजूनही तितकाच वेळ लागतो. त्यामुळे वैतागून लोक आंदोलनाचे हत्यार उपसतात. अशा नागरिकांना अशी गुन्हेगारासारखी वागणूक देणे, त्यांचे फोटो जाहीरपणे गेटवर लावणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला जात आहे.