शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पोहणे ठरले जीवघेणे

By admin | Updated: May 4, 2017 04:18 IST

उन्हाळ्याची सुटी तसेच वाढता उकाडा यामुळे पोहायला जाणे हा मुलांचा आवडता छंद झाला आहे. मात्र हाच छंद जीवघेणा ठरला

ठाणे : उन्हाळ्याची सुटी तसेच वाढता उकाडा यामुळे पोहायला जाणे हा मुलांचा आवडता छंद झाला आहे. मात्र हाच छंद जीवघेणा ठरला आहे. बुधवारी कळवा खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्यांचा तर मंगळवारी कल्याण खाडीत दोन वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. कळवा, मनीषानगर खाडी येथे बुधवारी १२.३० वा.च्या सुमारास ४ मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यापैकी दीपू हा बाहेरच थांबला होता. मयत कुलदीप विनोद राहोदिया (९) आणि बजिंदर सुरेंद्र सहानी (८) आणि जितू हे तिघे पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागल्याने दीपू याने ही माहिती तेथील नागरिकांना दिली. त्यांनी तातडीने ठाणे पोलीस कंट्रोल रूमला कळवले. कळवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी दाखल झाले. जितूला वाचवण्यात त्यांना यश आले. मात्र, कुलदीप आणि बजिंदर या दोघा चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आले आहेत. याचदरम्यान, मुलांना वाचवण्यासाठी गेलेले कर्मचारी रवी पवार यांच्या पायाला काच लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. काचेमुळे त्यांच्या पायाला ४ टाके पडले असून त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणाची कळवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बुडून मृत्यू होण्याची दुसरी घटना मंगळवारी कल्याण येथे घडली. कल्याण खाडीत आयुष रवींद्र इंगोले (वय २) याचा बुडून मृत्यू झाला. आयुष मंगळवारी दुपारी कल्याण खाडीनजीक खेळत होता. तो खेळताखेळता खाडीत पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. (प्रतिनिधी)