शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयीन पत्रातील भाषेवरून बीडीओ- तहसीलदारांमध्ये ‘पत्र युद्ध’!

By admin | Updated: June 29, 2016 02:11 IST

आकोटमधील प्रकार; पत्रलेखनातील आदेशात्मक भाषेवरून वाद.

राजेश शेगोकार / अकोलाआजच्या डिजिटल युगात पत्रलेखन हा प्रकार इतिहास जमा होण्याची भीती असली तरी शासकीय कार्यालयातील कामकाज या पत्रांच्या कागदी घोड्यावरच सुरू असतो. त्यामुळेच या पत्रातील भाषा कशी असावी, याबाबत राजशिष्टाचारानुसार काही संकेत ठरले आहेत. दोन अधिकार्‍यांमध्ये संवाद साधताना या संकेतांचे उल्लंघन झाले की मग दोन अधिकार्‍यांमध्ये वाद उपस्थित होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. आकोट तालुक्यातील तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यामध्ये असेच पत्रातील भाषेवरून पत्रयुद्ध रंगले असून त्याची महसूल विभाग तसेच जिल्हा परिषद वतरुळात खमंग चर्चा आहे.आकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालीदास तापी व तहसीलदार विश्‍वनाथ घुगे या दोन अधिकार्‍यांमध्ये पत्राची भाषा यावरून वाद सुरू झाला आहे. तापी हे ङ्म्रेणी-१ चे गटविकास अधिकारी आहेत. त्यांच्या सोबत पत्रव्यवहार करताना तहसीलदार घुगे यांच्या कार्यालयाकडून आदेशात्मक भाषा वापरली जाते. माहिती सादर करावी, असे आदेश तहसीलदारांकडून दिल्या जात असल्याने कालीदास तापी यांनी तहसीलदार घुगे यांना २१ जून रोजी पत्र पाठवून कार्यालयीन संकेतांचे पालन करण्याची आठवण करून दिली. तापी यांनी पत्रात नमूद केले आहे की ते, ङ्म्रेणी-१ चे गटविकास अधिकारी असल्यामुळे आदेशात्मक भाषेचा पत्रव्यवहार अनुचित ठरतो, पत्रलेखनासंदर्भात शासनाच्या निर्देशांचे पालन करणे अभिप्रेत आहे व तशी दक्षता पुढील पत्रव्यवहारात घेण्यात यावी. सदर पत्र हे जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही प्रतिलिपी म्हणून तापी यांनी पाठवत आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवल्या.या पत्राची तत्काळ दखल घेत तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांनी २३ जून रोजीच तापी यांच्या मोजून चार ओळीच्या पत्राला सविस्तर असे पानभर उत्तर पाठवून कार्यालयीन संकेतांची जंत्रीच सादर केली आहे. तापी यांच्या ङ्म्रेणी-१ च्या पदाबाबत कुठलाही संशय नसल्याचे सांगत तहसीलकडील अनेक जबाबदार्‍या पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीकडून माहिती मागवावी लागते. ही माहिती जिल्हाधिकारी यांच्या निर्देशावरूनही अनेकदा पंचायत समितीकडून घ्यावी लागते. तसेच तालुका दंडाधिकारी म्हणून नैसर्गिक आपत्ती, टंचाईमधील अधिग्रहण, निवडणुकीची कामे याबाबतही तहसीलदार म्हणून माहिती मागविण्याचे निर्देश द्यावे लागतात, असे स्पष्ट केले आहे. सोबतच ज्या कामात तहसीलदार यांना गटविकास अधिकारी कार्यालयाला आदेश देणे, निर्देशीत करणे, माहिती सादर करणे अशा स्वरूपाच्या सूचना द्याव्या लागतात ती कामे तहसीलदारांकडून काढून घेण्याची मागणी करावी असा सल्लाही घुगे यांनी तापी यांना पत्रात दिला आहे.