शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बीडीडी चाळ गैरव्यवहाराची चौकशी

By admin | Updated: July 31, 2015 02:38 IST

मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळींच्या देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या निधीत गैरव्यवहार झाला आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा

मुंबई : मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळींच्या देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या निधीत गैरव्यवहार झाला आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.बीडीडी चाळींच्या देखभाल- दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या निधीत झालेल्या गैरव्यवहाराचा विषय प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सुनिल शिंदे, नसीम खान, कालिदास कोळंबकर, गणपतराव देशमुख यांनी प्रश्न विचारला होता. यावर बोलताना बांधकाम मंत्री म्हणाले, सदर विषयाबाबत मुख्य अभियंत्यांना सविस्तर चौकशी करुन अहवाल शासनास सादर करण्याचे कळविण्यात आले आहे. चौकशी अहवाल येत्या एक महिन्यात तयार करण्यात येईल. तसेच या अहवालानुसार संबंधित अधिकारी / ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येते. यासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात निधीची तरतुद केली जाते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेबाबत चौकशी अहवाल सादरजळगाव येथील जिल्हा कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशी अहवाल सादर केला असल्याचे सहकार राज्यमंत्री दादाजी भूसे यांनी आज विधानसभेत सांगितले. आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना भूसे म्हणाले, जळगावच्या सहकारी संस्थेस या संदर्भात तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. १ एप्रिल २०१५ रोजी जिल्हा उपनिबंधक यांनी या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने चौकशी अधिकारी यांनी १६ जुलै रोजी अहवाल सादर केल्याचे ते म्हणाले.