शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

बीडीडी चाळ पुनर्विकासाचे भूमिपूजन दोन आठवड्यांत

By admin | Updated: April 2, 2017 01:42 IST

बीडीडी चाळीतील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून रहिवाशांचे मोठ्या घरात राहण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

मुंबई : बीडीडी चाळीतील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून रहिवाशांचे मोठ्या घरात राहण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पुनर्विकासात तेथील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर दिले जाईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत सांगितले.मुंबईतील आमदारांनी या संदर्भात नियम २९३ अन्वये प्रस्ताव मांडला होता. त्यावर उत्तर देताना वायकर म्हणाले की, या चाळींच्या पुनर्विकासाच्या कामाचे भूमिपूजन दोन आठवड्यांत करण्यात येणार आहे. वरळी, ना. म. जोशी मार्ग व नायगाव येथील राज्य शासनाची जागा व शिवडी येथे मुंबई बंदर न्यासाच्या जागेवर असे ९२.७० एकर जागेवर २०८ चाळी आहेत. १६,२०३ गाळे आहेत. पुनर्विकासाचे काम म्हाडामार्फत केले जाईल. ना.म. जोशी मार्ग येथील चाळीच्या पुनर्विकासासाठी शापुरजी पालनजी व नायगावच्या चाळीच्या पुनर्विकासासाठी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो या कंपन्यांची कंत्राटदार म्हणून निवड झाली. वरळी येथील चाळींचा पुनर्विकास हा निविदा स्तरावर आहे. प्रकल्पातून १३,६०० अतिरिक्त विक्रीयोग्य सदनिका निर्माण होणार आहेत. २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचे शासनाचे धोरण असल्याने रेल्वेच्या हद्दीतील झोपड्यांसंदर्भात रेल्वे अधिकारी, एसआरए तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)सेस इमारतींचा पुनर्विकास करताना अनेक वेळा विकासकाकडून अपूर्ण कामे करण्यात येतात. त्यामुळे यापुढे अशा इमारतींचा विकास करताना मालक, विकासक तसेच म्हाडा यांच्यात एक संयुक्त करार करण्यात येणार आहे. त्यासाठी मॉडेल अ‍ॅग्रिमेंट ड्राफ्ट तयार करण्यात येत असून त्याबाबत विधी सल्लागार समितीचा सल्ला घेऊनच याप्रश्नी एका महिन्यात सरकारकडून योग्य ती पावले उचलण्यात येणार आहेत.