शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

‘बाजार’अमावास्येचा

By admin | Updated: January 20, 2015 23:48 IST

अंधश्रद्धेला खतपाणी : सुशिक्षितांनीही पांघरला अज्ञानाचा बुरखा

संदीप खवळे - कोल्हापूर -पुरोगामी मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरात अमावास्येला अपशकून मानणारे मोठ्या संख्येने आहेत. आज, मंगळवारी झालेल्या अमावास्येला तथाकथित वाईट शक्तीला दूर ठेवण्यासाठी अंधश्रद्धेच्या आहारी जात सुमारे पाऊण लाख कुटुंबांनी लिंबू-मिरची-बिब्याची माळ दारावर लटकविली़ काहींनी ‘परंपरेचा भाग’ म्हणूनही याला आंधळेपणाने स्वीकारले. चहा विके्रत्यांपासून ते सराफ व्यावसायिकांपर्यंत आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती, शासकीय अधिकारी ते स्वत:ला सुशिक्षित म्हणणाऱ्यांच्या गाड्यांना लिंबू-मिरची आणि बिब्याचे ‘संरक्षक कवच’ दिसले़ अमावास्येमुळे नारळ, उदबत्ती, कापूर आणि लिंबू, बिब्बा, मिरच्या यांच्यासाठी शहरवासीयांच्या खिशाला सुमारे पंधरा लाखांवर कात्रीही लागली.काही सराफ व्यावसायिकांनी पेढीची पूजाअर्चा करून दुपारनंतर काढता पाय घेतला़ खरेदीचे व्यवहार होत नसल्यामुळे तीस टक्के दुकानांना कुलूप होते. तर काही रिक्षाचालकांनीसुद्धा रिक्षा घरीच लावणे पंसत केले. निसर्गचक्राचा एक भाग असलेल्या या अमावास्येनिमित्त ‘लोकमत’ने नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता, अमावास्येचे भय अनेकांच्या मनात आजही असल्याचे दिसले़ परंपरेचा भाग, वाईट शक्तींचा प्रभाव टाळण्यासाठी अमावास्या पाळत असल्याचे त्यांनी दबक्या आवाजात सांगितले़. पुरोगामी कार्यकर्त्यांनी मात्र अमावास्येला निसर्गचक्रातील घटना यापलीकडे महत्त्व देत नसल्याचे रोखठोक मांडले़ अमावास्येबाबत या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया़़़लिंबू-मिरची उलाढालअमावास्येच्या दिवशी एरवीपेक्षा लिंबू-मिरचीची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते़ आज, मंगळवारी लिंबू-मिरची आणि बिब्ब्यांची माळ शहरात ठिकठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात येते़ लिंबूबरोबरच नारळ, अगरबत्तीही ठेवण्यात आली होती़ नारळाची सरासरी किंमत दहा, तर मिरच्या, लिंबू व बिब्ब्यांची जुडी पाच रुपयांना होती. सोबत पाच रुपयांची अगरबत्ती़ महापालिकेकडे सुमारे एक लाख तीस हजार मिळकतींची नोंद आहे. यातील निम्म्याजणांनी खरेदी केल्याचे गृहीत धरले, तर हा आकडा तेरा लाखांच्या आसपास जातो़ याशिवाय शहरातील वाहनधारकांनी केलेली खरेदी वेगळीच ़़.लोकप्रतिनिधीहीजिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतींच्या गाडीलाही लिंबू, मिरच्या व बिब्बा दिसला. अंधश्रद्धेविरोधात कायदा झाला, तरी लोकप्रतिनिधींची मानसिकता बदलली नाही. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्नच आहे.नेहमीपेक्षा अमावास्येदिवशी सर्व्हिसिंगसाठी गाड्यांची गर्दी जास्त असते़ शिक्षित, निमशिक्षित, तसेच युवकही या दिवशी गाड्या सर्व्हिसिंगसाठी घेऊन येतात; पण गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. - व्यवस्थापक, शेतकरी बाजार सर्व्हिसिंग सेंटरअमावास्या आणि पौर्णिमेला नागरिक खरेदी करीत नाहीत़ त्यामुळे या दिवशी दुकान बंदच ठेवतो़ गुजरीतील सुमारे वीस टक्के सराफ दुकाने बंद असतात - धैर्यशील माने, मे़ माने ब्रदर्स अमावास्येदिवशी संध्याकाळी नारळ फोडतो़ गाडीची स्वच्छता करण्याबरोबरच लिंबू-मिरची लावणे, पूजा करणे या गोष्टी पाळतो़ करणीवर विश्वास नाही; पण मनशांतीचा भाग म्हणून हा विधी पार पाडतो. - शंकर गावडे, चहा विक्रेतेअमावास्या आणि पौर्णिमेला नागरिक खरेदी करीत नाहीत़ त्यामुळे या दिवशी दुकान बंदच ठेवतो़ गुजरीतील सुमारे वीस टक्के सराफ दुकाने बंद असतात - धैर्यशील माने, मे़ माने ब्रदर्स अमावास्या, पौर्णिमा याला निसर्गचक्र ाचा एक भाग या पलीकडे या गोष्टींना फारसे महत्त्व नाही़ मुलांवरही असेच संस्कार केले आहेत़ अमावास्येदिवशी अनेक चांगली कामे सुरू केली़ ही सर्व कामे यशस्वी झाली़ - माणिक यादव, शिक्षक अमावास्या निसर्ग चक्राचा भागविज्ञाननिष्ठ दृष्टिकोन नसलेली माणसे यांचा संबंध अशास्त्रीय पद्धतीने लावून कर्मकांडाचे स्तोम माजवत असतात. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, तर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो़ चंद्राला स्वत:चा प्रकाश नाही़ पृथ्वीची सूर्याभोवती आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा वेगवेगळ्या पातळीत आहे़ या पातळी एकमेकांना पाच अंशांचा कोन करतात़ त्यामुळे जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांमध्ये चंद्र येतो, तेव्हा तो पाच अंशांनी वर असतो. अशावेळी सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो व चंद्रावरून परावर्तित झालेला प्रकाश पृथ्वीच्या अंधार पडलेल्या भागात पोहोचत नाही़ परिणामी आकाश काळेकुट्ट होते. यालाच आपण अमावास्या म्हणतो, असे खगोलशास्त्र अभ्यासक डॉ. नितीन शिंदे यांनी सांगितले. परंपरेचा भाग म्हणून अनेक नारळ वाढवितो़ लिंबू-मिरच्या व बिब्यांची जुडी रिक्षाला बांधतो़ परंपरेचा भाग म्हणून या विधी करतो़ काही रिक्षावाले अमावास्येदिवशी रिक्षाच बाहेर काढत नाहीत किंवा रिक्षाची दुरुस्ती करीत नाहीत.- सुनील चव्हाण, रिक्षाचालक अमावास्येदिवशी उतारा टाकण्याची किंवा लिंबू अन् गंडेदोरे बांधण्याची सक्ती एखादी व्यक्ती करीत असल्यास किंवा तसा प्रसार करीत असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीवर जादूटोणाविरोधी कायद्यातील तरतुदीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षेची आणि पाच ते ५० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. - अविनाश पाटील, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कार्यकारिणी अध्यक्ष.वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे अमावास्या आणि पौर्णिमेदिवशी नागरिक चांगल्या कार्याची सुरुवात करीत नाहीत़ अमावास्येदिवशी एखादे मूल जन्माला आले, तर त्याला आपण टाकून देतो का़़.? इतिहासातील अनेक लढाया अमावास्येदिवशीच सुरू झालेल्या आहेत़ विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा प्रसार वाढला पाहिजे. - वसंत मुळीक, जिल्हाध्यक्ष, मराठा महासंघ