शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेची आज लढाई

By admin | Updated: December 27, 2015 02:46 IST

विधान परिषदेच्या ७ जागांच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून, त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपा-शिवसेना युतीत रस्सीखेच आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था

मुंबई : विधान परिषदेच्या ७ जागांच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून, त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपा-शिवसेना युतीत रस्सीखेच आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली असून, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास विजयी झाले आहेत. बुधवारी मतमोजणी होणार आहे.निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता असल्याने शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून खबरदारी घेतली जात आहे़ मुंबईतून दोन जण निवडून जाणार आहेत़ शिवसेनेने पर्यावरण मंत्री रामदास कदम, काँग्रेसने भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड रिंगणात उतरल्याने काँगे्रसची अडचण झाली आहे. अशा आहेत लढतीअहमदनगरमध्ये विद्यमान आमदार अरुण जगताप (राष्ट्रवादी) आणि युतीकडून प्रा. शशिकांत गाडे (शिवसेना) रिंगणात आहेत. धुळेसाठी काँग्रेसचे अमरिशभाई पटेल व भाजपाचे शशिकांत वाणी यांच्यात लढत होत आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे सतेज पाटील व भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार आमदार महादेवराव महाडिक यांच्यात थेट लढत होत आहे.सोलापूरमध्ये आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार दीपक साळुंखे व भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांच्यात चुरस आहे. अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघात युतीचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरीया व काँग्रेस-राष्ट्रवादीचे रवींद्र सपकाळ यांच्यात सरळ लढत होत आहे. मतदार संघजागामुंबई२कोल्हापूर१धुळे-नंदुरबार१अहमदनगर१अकोला-बुलडाणा -वाशिम१सोलापूर१- नागपूरमधील एका जागेवर भाजपाचे व्यास बिनविरोध निवडून आले आहेत.