शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात धावणार बॅटरीवरील बस

By admin | Updated: February 5, 2016 04:01 IST

मोठ्या वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून भविष्यात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळ

पुणे : मोठ्या वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून भविष्यात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या (पीएमपीएमएल) पाच डिझेल बसेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बदल करून याच बसेस बॅटरीवर चालविल्या जाणार आहेत. देशभरातील सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या बसेस इलेक्ट्रिक करण्यासाठीचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून हाती घेण्यात आला आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. पीएमपीएमएलसह बेस्ट, बंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) तसेच तेलंगणा यांच्याही बसेसमध्ये बदल करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर संसदेच्या आवारात इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण करण्यात आले होते. याच धर्तीवर मोठ्या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या संस्थांच्या बसेसही बॅटरी आॅपरेटेड करण्यासाठी ‘कन्वर्जन आॅफ बसेस टू इलेक्ट्रिक कॉन्फिगरेशन’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यात पहिल्या टप्प्यात सुमारे २० बसेसच्या इंजिनमधे बदल करून त्या बॅटरी आॅपरेटेड बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या केपीआयटी आणि सनहिटेक या दोन कंपन्यांनी सादरीकरण केले असून, सीआयआरटीच्या माध्यमातून निविदा मागवून हे काम करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)