शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बॅटने मारहाण करत आईनेच केला मुलाचा खून

By admin | Updated: August 7, 2015 12:38 IST

उच्चशिक्षित आईने पोटच्या मुलाला कोंडून ठेवत त्याची उपासमार करून लाकडी बॅटने जबर मारहाण करीत खून केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे

येरवडा : उच्चशिक्षित आईने पोटच्या १३ वर्षीय मुलाला कोंडून ठेवत त्याची उपासमार करून लाकडी बॅटने जबर मारहाण करीत खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. माणुसकीलाच काळिमा फासणारी ही घटना विश्रांतवाडीजवळील टिंगरेनगरमध्ये घडली. या खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट नसून अनैतिक संबंधांना अडथळा ठरत असल्याने हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

चैतन्य तरुण बालपांडे असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई राखी तरुण बालपांडे (वय ३६, रा. फ्लॅट क्र.१, एस.बी.एनक्लेव, रस्ता क्र.१, टिंगरेनगर) हिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालपांडे कुटुंबीय मूळचे नागपूरचे आहे. शास्त्र विषयात पदवीधर (बीएस्सी) असलेल्या राखीचा १५ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र अलीकडील काळात तिचे पतीसोबत पटत नव्हते. दीड वर्षात ती अलिप्त राहू लागली. घटस्फोटाचा दावा न्यायालयात दाखल (पान ७ वर) राखी चैतन्यला पोटभर खायलाही देत नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.

चैतन्य स्नानगृहात खाली पडल्याने जखमी झाल्याचे राखी सांगत होती, मात्र चैतन्यला जबर मारहाण झाल्याचा डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांना कळवले.