शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांना भाजपाच्या बड्या नेत्यांचा आधार

By admin | Updated: June 26, 2016 02:43 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याचे मंत्रीपद असताना भाजपा-शिवसेनेचे मंत्री, नेत्यांनी आपला राजकीय प्रभाव वापरून नियमबाह्य बदल्या करून घेतल्या.

- यदु जोशी,  मुंबईभाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याचे मंत्रीपद असताना भाजपा-शिवसेनेचे मंत्री, नेत्यांनी आपला राजकीय प्रभाव वापरून नियमबाह्य बदल्या करून घेतल्या. बदलीच्या कायद्याची राज्यकर्तेच कशी पार मोडतोड करतात याचे ‘उत्तम’ उदाहरण त्यांनी घालून दिले. या नियमबाह्य बदल्यांची शिफारस करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, खा. आनंदराव अडसूळ, आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह काही आमदारांनी कायद्याची ऐशीतैशी करण्यास हातभार लावल्याचे समोर आले आहे. अकोला येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे हे बदलीपात्र नसतानाही आणि त्यांचे कोणतेही निवेदन नसताना फुंडकर यांनी १७ जानेवारी २०१५ रोजी एकनाथ खडसे यांना लहाळेंची बदली बुलडाणा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर करण्याची विनंती केली. बुलडाणा येथे या पदावर असलेले विवेक सोनवणे हेही बदलीस अपात्र असताना त्यांना बुलडाण्यातच प्रकल्प संचालक (आत्मा) या पदावर पाठविण्यात आले. त्यानंतर दोनच महिन्यांच्या आत सोनवणेंना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर जळगाव येथे नियमबाह्य पाठविण्यात आले. खा. रक्षा खडसे यांनी सोनावणेंना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावरून हटवू नये, असे पत्र दिले होते. त्यांच्या पत्रावर, ‘सोनवणेंना एक वर्ष मुदतवाढ द्यावी’ असा शेरा खडसेंनी दिला; पण पुढे सोनवणेंची बदली केली. सुभाष एस. काटकर हे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ पुणे येथे विशेष कार्यकारी अधिकारी होते. ते बदलीला अपात्र असताना आणि त्यांचे कुठलेही निवेदन नव्हते, सार्वत्रिक बदल्यांचा काळही नव्हता तरीही मंत्री गिरीश बापट यांनी त्यांची बदली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी; पुणे या पदावर करण्याची शिफारस केली. त्यावर, विनंतीप्रमाणे बदली करावी, असा शेरा खडसे यांनी दिला. अधीक्षक पदावर असलेले ज्ञानेश्वर बोटे हेही बदलीस पात्र नव्हते. हे दोघेही बदलीस पात्र नसल्याचा शेरा कृषी विभाग प्रशासनाने दिला. तो डावलून काटकर आणि बोटेंची बदली करण्यात आली. त्यानंतर काहीच दिवसांत बोटे यांची नियमबाह्यरीत्या बदली राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ; पुणेच्या प्रकल्प व्यवस्थापकपदी करण्यात आली. काटकर आणि बोटे अनेक वर्षे मलाईदार पदांवरच राहतात, असा दावा स्वामी विवेकानंद प्रेरित समग्र सुधार मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत कायंदे यांनी राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीत केला असून, दोघांच्याही संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. उपसंचालक (आत्मा) पुणे या पदावर प्रतापसिंह शंकरराव कदम यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी बदली करण्यात आली. ते त्या पदावर रुजू झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ८ फेब्रुवारी रोजी खडसे यांना पत्र देऊन कदम यांची बदली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी; लातूर या पदावर करण्याची शिफारस केली. विनंतीनुसार बदली करावी, असे लेखी आदेश खडसेंनी दिले आणि ही बदली नियमानुसार नसल्याचा विभागाचा अभिप्राय डावलून कदम यांची लातूरला बदली करण्यात आली. त्याला आपापसातील (म्युच्युअल) बदलीचा मुलामा देण्यात आला. ही बदली कशी नियमबाह्य होती याचा खुलासा राज्यपालांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. (क्रमश:)खडसेंच्या कारभारावर टीकेची झोड उठवित असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, भाजपाचे आमदार जयकुमार रावल, आ. योगेश टिळेकर, शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ, आ. बाबूराव पाचर्णे यांनी नियमबाह्य बदल्यांच्या शिफारशी केल्या आणि त्यानुसार बदल्याही करण्यात आल्या. पांडुरंग दिनकरराव शिंगेदार हे प्रकल्प संचालक (आत्मा); ठाणे या पदावर प्रतिनियुक्तीने गेले होते. प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असला तरी नियुक्ती अधिकारी एक महिन्याची नोटीस देऊन त्यांना परत बोलावू शकतो. मात्र असे काहीही न होता, सार्वत्रिक बदल्यांचा काळ नसतानाही शिंगेदार यांची खोपोली येथे उपविभागीय कृषी अधिकारी या पदावर बदली करण्यात आली. मुख्यमंत्र्यांची त्यास मान्यताही घेण्यात आली नाही. विभागाच्या वेबसाईटवर हा आदेश टाकण्यात आला नव्हता. काही नियमबाह्य बदल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.