शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांना ‘रोटी बँक’चा आधार

By admin | Updated: April 30, 2016 02:22 IST

पाण्याअभावी संपूर्ण राज्यालाच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यामुळे सर्व स्तरातून पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई : पाण्याअभावी संपूर्ण राज्यालाच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यामुळे सर्व स्तरातून पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही काळात मुंबईवर पाणीटंचाईची परिस्थिती ओढावू नये, याकरिता गेल्या काही दिवसांत समाजातील सर्व घटकांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांनीही यासाठी पुढाकार घ्यायचे ठरविले आहे.१ मे रोजी कामगार दिनाचे निमित्त साधून डबेवाले घरोघरी पाणी वाचविण्याचा संदेश देणार आहेत. यात डबेवाले मुंबईकरांना ‘पाणी कमी वापरा’, ‘पाण्याचा अपव्यय टाळा’ असे आवाहन करणार आहेत. डब्याच्या माध्यमातून २ लाख ग्राहकांच्या घराघरांत पोहोचणारे डबेवाले ही मोहीम एक आठवडा राबविणार आहेत.अन्न-पाण्याच्या शोधात मुंबईत विसाव्याला आलेल्या दुष्काळग्रस्तांनाही डबेवाल्यांनी आधार द्यायचे ठरविले आहे. ‘रोटी बँक’च्या माध्यमातून दररोज शेकडो भुकेलेल्यांना ते अन्न देतात. याच रोटी बँकच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना ‘मायेचा घास’ डबेवाले देणार आहेत. याविषयी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले की, समाजातील समस्यांवर मात करण्यासाठी डबेवाल्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. याच सामाजिक जाणिवेतून डबेवाल्यांनी ही अभिनव मोहीम हाती घेतली असून, या माध्यमातून जास्तीत जास्त दुष्काळग्रस्तांना आधार देण्याचा मानस आहे. (प्रतिनिधी)