शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वरसगावने गाठला तळ

By admin | Updated: July 2, 2016 01:46 IST

खडकवासला धरणातील सर्वाधिक पाणीसाठा क्षमता असलेले दुसऱ्या क्रमांकाच्या वरसगाव धरणानेही तळ गाठला आहे.

पुणे : खडकवासला धरणातील सर्वाधिक पाणीसाठा क्षमता असलेले दुसऱ्या क्रमांकाच्या वरसगाव धरणानेही तळ गाठला आहे. या धरणांमध्ये अवघा ०.०९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून टेमघर धरणापाठोपाठ या धरणातील पाणीही संपले आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या चारही धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १.४६ टीएमसी शिल्ल्क आहे. खडकवासला धरणसाखळीमधील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता ही २९.५० टीएमसीची आहे. त्यात सर्वाधिक पाणीसाठा पानशेतचा असून त्या खालोखाल वरसगाव धरणाचा पाणीसाठवण क्षमता साडे दहा टीएमसीची आहे. जून महिना संपत आला असला तरी या चारही धरणांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने या धरणामधील पाणीही संपले आहे. त्यामुळे आता केवळ खडकवासला आणि पानशेत धरणांमध्येच पाणी शिल्लक असून खडकवासला धरणामध्ये ०.४७ तर पानशेत धरणामध्ये ०.९७ टीएमसी साठा शिल्लक आहे. (प्रतिनिधी)>१६७ मिलिमीटर : पाणलोट क्षेत्रात तुरळक पावसाची हजेरी पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी सहा ते शुक्रवारी (दि.१) सायंकाळी ५ वाजेपर्यंत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६ मिमी, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३७ मिमी, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३५ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.>पाणीसाठ्यातविशेष वाढ नाहीया शिवाय धरणांच्या लगत असलेल्या नाले, ओढ्यांमधून काही प्रमाणात पाणी येत असले तरी त्यामुळे पाणीसाठ्यात काही विशेष वाढ झाली नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.