शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बृहत आराखड्याचीही आजची डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:39 IST

निकालाच्या डेडलाइनच्या गोंधळात मुंबई विद्यापीठाला बृहत आराखड्याचा पडलेला विसर आता विद्यापीठाच्या अंगाशी आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निकालाच्या डेडलाइनच्या गोंधळात मुंबई विद्यापीठाला बृहत आराखड्याचा पडलेला विसर आता विद्यापीठाच्या अंगाशी आला आहे. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच सिनेटची बैठक रविवारी होणार होती. पण राज्यपालांनी बैठकीला परवानगी नाकारल्याने रविवारी फक्त बृहत आराखडा समिती आणि अधिष्ठाता मंडळाची बैठक पार पडली. आता सोमवारी अ‍ॅकॅडमिक कौन्सिल, मॅनेजमेंट कौन्सिल आणि सिनेटची बैठक घेऊन बृहत आराखड्याची डेडलाइन आणि परीक्षांचे निकाल अशी दुहेरी कसरत विद्यापीठाला करावी लागणार आहे. पण राज्यपाल सोमवारच्या सिनेट बैठकीला परवानगी देतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबई विद्यापीठात पुढच्या शैक्षणिक वर्षात नवीन अभ्यासक्रम, नवीन तुकड्या, नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी बृहत आराखडा सरकारकडे सादर करणे गरजेचे असते. सरकारने विद्यापीठाला ३१ जुलैपर्यंत बृहत आराखडा सादर करण्याची डेडलाइन दिली होती. पण यंदा विद्यापीठाच्या निकालाला लेटमार्क लागल्याने राज्यपालांनी हस्तक्षेप करून ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे विद्यापीठाने सर्व लक्ष निकालांवर केंद्रित केले होते. त्याच गडबडीत बृहत आराखड्याचा विसर पडला.बृहत आराखडा डेडलाइनच्या एक दिवस आधी पास करून घेण्यासाठी रविवारी सर्व बैठका घेण्याचे विद्यापीठाने योजले होते, पण या निर्णयावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काही सदस्य हे रविवारी विद्यापीठात बैठकीसाठी हजर राहिले नाहीत. बृहत आराखडा समिती आणि अधिष्ठाता मंडळाची बैठक झाली असून त्यात आराखडा पास करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून मिळाली. मुंबई विद्यापीठात सिनेटची बैठक घेण्यास राज्यपालांच्या परवानगीची गरज असते. यासाठी राज्यपाल कार्यालयाला बृहत आराखड्याचा मसुदा पाठवावा लागतो. पण मसुदा न पाठवल्याने परवानगी नाकारल्याची माहिती सिनेटचे माजी सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.