शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीकरांचा ‘ताप’ उतरेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 01:29 IST

यंदा याच आरोग्यदायी ऋतूमध्ये गोचीडताप, चिकुनगुनिया, विषाणुजन्य तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.

बारामती : थंडीचा कालावधी आरोग्यदायी समजला जातो. मात्र, यंदा याच आरोग्यदायी ऋतूमध्ये गोचीडताप, चिकुनगुनिया, विषाणुजन्य तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकांची दिवाळी आजारपणाला तोंड देण्यातच गेल्याचे चित्र आहे.शहरातील डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. डासांचे वाढते प्रमाण रोखण्यास नगरपालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. परिणामी विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये डेंगीसदृश रुग्णदेखील आढळत आहेत. बारामती शहरातील डॉ. आर. डी. वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेने चिकुनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. यंदा या आजारासह डेंगीसदृश आजाराचे गतवर्षीच्या तुलनेने रुग्ण जास्त आहेत. त्यामध्ये सांधेदुखीसह थंडीताप, उलटी, मळमळणे ही लक्षणे आढळून येत आहेत. तसेच शहरातील डॉ. पे्रमेंद्र देवकाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की चिकुनगुनिया, चिकुन गुनियासदृश आजारांच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अनेकांची दिवाळी साजरी झालीच नाही. दिवाळी आजारपणातच गेली. सांधेदुखी, ताप, अंगदुखी, डोकेदुखीची लक्षणे आढळणारे रुग्ण दवाखान्यात येतच आहेत. यासाठी डासांची उत्पत्ती रोखणे आवश्यक आहे. पाऊस थांबल्यावरच त्या दृष्टीने दक्षता घेणे आवश्यक आहे. तर, नागरिकांनी डासांपासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करावा.भवानीनगर येथील डॉ. राकेश मेहता यांनी सांगितले, की काटेवाडी (ता. बारामती) परिसरात अद्यापही डेेंगीचे रुग्ण आढळत आहेत. त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. तर, गोचीडतापाचे रुग्ण अधिक संख्येने आढळत आहेत. याशिवाय, विषाणुजन्य तापाचे रुग्णांची संख्या मोठी आहे. यासाठी रुग्णांची प्रतिकारक्षमतादेखील महत्त्वपूर्ण ठरत आहे. परिपूर्ण आहार, कडधान्ये, पालेभाज्यांचा आहारात समावेश प्राधान्याने करायला हवा. प्रतिकारक्षमता विकसित केल्यास विविध आजाराच्ंया रुग्णांचे प्रमाण घटण्यास मदत होईल. लहान मुलांमध्ये सर्दी, तापाचे रुग्ण आहेत. सध्या दिवाळीच्या फराळाचा आग्रह सर्वत्र होताना दिसतो. त्यामुळे जुलाब, पोटदुखीचा त्रास होतो. त्यामुळे अति तेलकट पदार्थ टाळावेत. थंडीचा काळ खरे तर आरोग्यदायी मानला जातो; मात्र यंदा हा काळ आरोग्यदायी व अनुकूल नसल्याचे चित्र आहे. विविध आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. (प्रतिनिधी)सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी चिकुनगुनिया, गोचीडतापाच्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने शहरात कमी आहे. प्रशासनाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी साठविताना दक्षता घ्यावी. कोरडा दिवस पाळावा. या आजारांचे प्रमुख कारण डासांची उत्पत्ती हेच आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागात चिकुनगुनिया, गोचीडताप या आजारांचे प्रमाण तुरळक असल्याचा दावा केला आहे. प्रशासनाने वेळेत याबाबत दक्षता घेतली; त्यामुळे या रुग्णांचे प्रमाण तुरळक आहे.नारळाच्या करवंट्या, रिकामे टायर नष्ट करावेत. नागरिकांनी आजाराची लक्षणे आढळल्यास सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाशी संपर्क साधावा. त्यासाठी रुग्णालयात पुरेसा औषधसाठा आहे.शहरातील खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या विविध आजारांच्या रुग्णांचा अहवाल गुरुवारी (दि. ३) मिळणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात येईल.