शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस, सरकार काय तोडगा काढणार?
3
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
4
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
5
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
6
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
7
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
8
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
9
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
10
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
11
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
12
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
13
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
14
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
15
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
16
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
17
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
18
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
19
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
20
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

बारामती, इंदापुरात गुटखाबंदीचा फार्स

By admin | Updated: October 24, 2016 01:24 IST

राज्यात गुटखा विक्रीला बंदी आहे. त्याचबरोबर उत्पादनालादेखील बंदी आहे. मात्र, परराज्यांतून बारामती, इंदापूरमध्ये गुटखा आणून चढ्या भावाने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची साखळी आहे

बारामती / इंदापूर : राज्यात गुटखा विक्रीला बंदी आहे. त्याचबरोबर उत्पादनालादेखील बंदी आहे. मात्र, परराज्यांतून बारामती, इंदापूरमध्ये गुटखा आणून चढ्या भावाने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची साखळी आहे. त्यामुळे ‘गुटखाबंदी’चे धोरण कागदावरच राहिले आहे. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक खात्याकडूनदेखील ‘मॅनेज’ कारवाई केली जाते. इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील व्यापाऱ्यावर मागील आठवड्यात या खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईची चर्चा जोरदार आहे. लासुर्णे गावात भर व्यापारपेठेत हा व्यापारी मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करतो. याची माहिती जंक्शन (वालचंदनगर) पोलिसांनादेखील आहे. या पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याची खास उठबस या व्यापाऱ्याबरोबर होती. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर मागील आठवड्यात त्यांच्या व्यापार पेठेतील दुकानावर अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक पथकाने धाड टाकली. जवळपास ६० ते ७० लाख रुपयांचा गुटखा होता, असे सांगितले जाते. मात्र, कारवाईत २५ लाख रुपयांचाच गुटखा जप्त केल्याचे सांगण्यात आले. भरदिवसा ही कारवाई झाली. परंतु, उर्वरित मालासाठी झालेली तडजोड लाखोंची होती, अशी चर्चा आहे. (प्रतिनिधी)१ राज्यात गुटखाबंदीचा निर्णय दोन वेळा झाला; मात्र बंदी सोडाच, परंतु त्याची संधी घेऊन गुटखा विक्री, मालाचा साठा बारामतीत असतो. विशेषत: गुटख्यावर बंदी आणण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतला होता. परंतु, बारामतीतच चार ते पाच व्यापारी मोठ्या प्रमाणात परराज्यांतून ट्रक, टेम्पो, आयशर गाड्यांनी गुटखा विक्रीसाठी आणतात. त्याचे आगार बारामतीत आहे. परंतु, या व्यापाऱ्यांची इंदापूर, पुरंदर, फलटण, दौंड या तालुक्यांमध्येदेखील गोडावून आहेत. २बारामतीच्या व्यापाऱ्यांचे थेट अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांशी संबंध आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे कारवाई होत नाही. कारवाई करायची असेल तर पुण्यातून गाड्या निघाल्यावर व्यापाऱ्यांना त्याची माहिती मिळते, हे विशेष. त्यामुळे गोडावूनमधील माल सुरक्षित ठिकाणी हलविला जातो. लासुर्णे येथील व्यापाऱ्यावर कारवाई करतानादेखील अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक खात्याचे पथक बारामती, इंदापूरमध्ये येणार असल्याची माहिती होती. ३ परंतु, कारवाई झालेल्या व्यापाऱ्यालादेखील त्याची माहिती देण्यात आली होती. परंतु, नेमकी कारवाई कोणत्या व्यापाऱ्यावर होणार, याची पथकातील ‘खबऱ्या’ला माहिती नव्हती. कारवाई झाली. २० ते २५ लाखांचा माल जप्त झाला. उर्वरित मालासाठी मात्र आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारला खऱ्या अर्थाने गुटखा विक्रीवर बंदी आणायची आहे का, असाच प्रश्न निर्माण झाला आहे. ४‘कुंपणच शेत खात’ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गुटख्यावरील बंदी कागदोपत्री आहे. कर्नाटक, आंध्र आदी राज्यांतून लाखो रुपयांचा माल येतो. रातोरात त्याची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे गुटखा विक्रीवर होत असलेली कारवाई ‘तडजोडी’ची ठरत आहे. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक खात्याकडून ठोस कारवाई झाली पाहिजे. तसेच, पोलिसांकडून किरकोळ दुकानदारांवर कारवाई करण्यापेक्षा व्यापाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. गुटखा विक्रीने मालामाल...बंदी असल्यामुळे चढ्या दराने व्यापारी किरकोळ दुकानदारांना माल विकतात. एमआरपीपेक्षा ५ ते १० पट अधिक दराने विक्री होते. बारामतीच्या कसबा, जामदार रोड भागातील मुख्य व्यापाऱ्यासह ५ ते ६ व्यापारी मालामाल झाले आहेत. गुटखाबंदी ही पर्वणीच समजून ट्रक, टेम्पोने मालाची विक्री केली जाते. यदाकदाचित माल पकडलाच तर जागेवर तडजोड करण्यासदेखील व्यापारी मागेपुढे पाहत नाहीत. काही वर्षांपूर्वी अल्पभूधारक असलेले व्यापारी आता बागायतदार म्हणून वावरू लागले आहेत. इंदापूरमध्येदेखील असेच प्रकार...इंदापूर शहरातील गुटखा विक्रीवर कारवाई करण्याऐवजी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी गुटखा विक्रेत्यांना पकडून आर्थिक तडजोड करून, केवळ तंबी देण्याची कारवाई करत असल्याचे प्रकार सध्या घडत आहेत. गेल्या दोन आठवड्यांत असे प्रकार सतत घडत आहेत. गुटखा विक्री करणाऱ्याला गुटख्यासह पकडायचे. दबाव आणण्यासाठी कागद रंगवण्याचा बहाणा करायचा. तोपर्यंत स्थानिक कोणी तरी मध्यस्थ होतो. ‘साहेब कशाला वाढवताय? मिटवून घ्या,’ असे सांगतो. लालूच दाखवतो. साहेब आढेवेढे घेतात. हे नाटक समाधानकारक आकडा गाठेपर्यंत चालू राहते. मात्र, समाधानकारक तडजोड झाली, की अधिकारीदेखील खूश होतात. विक्रेताही धंद्याला जीवदान मिळाले म्हणून नि:श्वास सोडतो. सारे कसे आलबेल होते. कारवाईची लक्तरे होतात. या बाबींमुळे कारवाई करण्यासाठी आलेले अधिकारीच आहेत की कुणी तोतया चोरावर मोर होतो आहे, अशी शंका लोकांमधून व्यक्त होते.