शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

बाप्पांचे आगमन झाले सुखावह

By admin | Updated: September 2, 2014 00:07 IST

गणपती बाप्पांचे आगमन म्हणजे ढोल, ताशांचा दणदणाट आणि त्याला मिळणा:या कानठळ्या बसवेल अशा बॅन्जोची जोड हे समीकरण ठरलेले होते.

ठाणो : गणपती बाप्पांचे आगमन म्हणजे ढोल, ताशांचा दणदणाट आणि त्याला मिळणा:या कानठळ्या बसवेल अशा बॅन्जोची जोड हे समीकरण ठरलेले होते. बाप्पा जरी मनोवेधक, आकर्षक असले, त्यांचे आगमन सुखावह वाटत असले तरी त्यांच्यासोबत असलेला हा वाद्यांचा दणदणाट आणि खणखणाट मात्र भक्तांना असह्य व्हायचा. परंतु, या वेळी मात्र कायद्याच्या बडग्यामुळे व पोलिसांच्या जागरूकतेमुळे हे प्रकार यंदा ब:याच अंशी टाळता आलेत. त्याला अनेक मंडळांच्या सुजाण पदाधिका:यांनी दिलेली साथदेखील कारणीभूत ठरली, त्यामुळेच यंदाचे बाप्पांचे आगमन जोषात परंतु शांततेत घडून आले. त्याबद्दल गणोशभक्तही समाधान व्यक्त करीत आहेत. 
गणोशोत्सव मंडळांमध्ये जशी मूर्तीच्या उंचीची, सजावटीची व मंडपाच्या भव्यतेची स्पर्धा असते. तशीच स्पर्धा त्यांच्या बाप्पाचे आगमन जास्तीतजास्त दणदणाटात करण्याची असते. मग, त्यासाठी एकाने नाशिकचा प्रसिद्ध ढोल मागविला की, दुसरे मंडळ कर्णकर्कश ताशा मागवायचे तर कुणी जबरदस्त दणदणाट करणारे डीजे आणून त्याला बॅन्जोची जोड द्यायचे. 45 डेसिबल ही मानवी श्रवणशक्तीची कमाल मर्यादा असतानाही 3क्क् ते 4क्क् कधी-कधी त्यापेक्षाही अधिक डेसिबल्सचा दणदणाट घडवणारे डीजे असह्य व्हायचे. ज्या परिसरातून अशी मिरवणूक जायची, तेथील घरांच्या काचा, भांडी, इतर सामान व्हायब्रेट व्हायचे, कधी पडायचे तर ज्यांना ते असह्य व्हायचे, असे भक्त मिरवणुकीतील मूर्तीचे दर्शन होताच दारे, खिडक्या बंद करून घेणो अधिक पसंत करायचे. ज्या ठिकाणी मिरवणूक थांबायची, तिथल्या दुकानदार आणि रहिवाशांवर तसेच पादचा:यांवर कानात कापसाचे बोळे किंवा हाताची बोटे घालण्याची वेळ यायची. या सगळ्या धांगडधिंग्याला कोण आणि कधी आळा घालणार, हा प्रश्न नागरिकांच्या व भक्तांच्या मनात घोंघावत असतानाच न्यायालयानेच पुढाकार घेऊन हा प्रश्न ऐरणीवर आणला आणि आदेश देऊन तो सोडवलाही, मात्र त्याची अंमलबजावणी पोलीस कितपत करू शकतील, अशी शंका सगळ्यांना होती. परंतु, ती पोलिसांनी अनेक मंडळांच्या कार्यकत्र्याना विश्वासात घेतल्याने तिचे निरसन झाले व आदेशाची अंमलबजावणीही शिक्षेच्या भीतीनेच नव्हे तर समन्वय आणि संवादातूनही होऊ शकते, हे दिसून आले.
काही मंडळांच्या कार्यकत्र्यानी सांगितले की, न्यायालयाचा मान राखण्यासाठी व पोलिसांना सहकार्य करण्यासाठी तसेच मिरवणुकीत विघ्न येऊ नये म्हणून आम्ही स्वेच्छेनेच यंदा शांततामय अशी मिरवणूक काढण्याचे ठरविले होते. 
गणरायाच्या स्थापनेपासून ते विसजर्नार्पयत मंडपात वापरल्या जाणा:या ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची पातळीही यंदा खूपच सुसह्यआहे. ब:याच मंडळांनी केवळ आरतीपुरताच त्याचा वापर केला. त्यामुळे बाप्पांचे आगमन आणि त्याचे वास्तव्य अधिक सुखावह आणि सुसह्यझाले आहे.
 
गणोश मंडळांनी ध्वनिप्रदूषण न करता आवाजाची मर्यादा पाळण्याचे आवाहन मंडळाची बैठक घेऊन केले होते. सर्वच नियम काटेकोर पाळणा:यांना बक्षिसेही देण्यात येणार आहेत. त्यानुसार, अनेक मंडळांनी ही मर्यादा पाळण्याचे मान्यही केल्यानुसार ते आता ध्वनिप्रदूषण करीत नसल्याचे आढळून आले आहे.
- व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, सहपोलीस आयुक्त, ठाणो शहर