शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाचा वीकेंड हाऊसफुल्ल

By admin | Updated: September 26, 2015 03:17 IST

गणेशोत्सवाचे शेवटच्या तीन दिवशी बकरी ईद, चौथा शनिवार आणि अनंत चतुर्दशी अशा सलग तीन सरकारी सुट्ट्या आल्याने बाप्पाचा विकेंड हाऊसफुल्ल ठरणार आहे.

मुंबई : गणेशोत्सवाचे शेवटच्या तीन दिवशी बकरी ईद, चौथा शनिवार आणि अनंत चतुर्दशी अशा सलग तीन सरकारी सुट्ट्या आल्याने बाप्पाचा विकेंड हाऊसफुल्ल ठरणार आहे. शुक्रवारी पहिल्याच सुट्टीच्या दिवशी भक्तांनी मुंबईच्या रस्त्यावर गर्दी करत पुढील दोन दिवसांत उसळणाऱ्या महासागराची सूचना दिली आहे.आज सकाळपासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींच्या दर्शनासाठी रांगा लागू लागल्या होत्या. गणेशगल्लीतील मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती, अंधेरीचा राजा, फोर्टचा इच्छापूर्ती अशा काही गणपतींच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची गर्दी आवरण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज कामाला लागली होती. त्यामुळे सुट्टी असतानाही बेस्ट आणि ट्रेनला दिवसभर गर्दी दिसली. नरे पार्क, शिवडीचे प्रबोधनकार ठाकरे क्रीडांगण, काळाचौकीतील शहीद भगत सिंग मैदानांसह मुंबई उपगनरांतील बहुतेक ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त जत्राही भरल्या आहेत. याठिकाणीही गणेशभक्तांनी हजेरी लावत मनमुराद आनंद लुटला. आकाश पाळणे, फन बलून, फुगे फोडणे अशा विविध साधनांतून तरुणांसह बच्चेकंपनीनेही धमाल केली. शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने सार्वजनिक मंडळांमध्ये अहवाल प्रकाशनाची लगीनघाई दिसून आली. जाहिरातदार, देणगीदार, वर्गणीदार यांच्या नावासह सामाजिक उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी छापण्यात येणारे अहवाल प्रकाशित करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते प्रिटींग प्रेसच्या चक्करा मारत होते.