शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

अवघी मुंबापुरी झाली ‘बाप्पा’मय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2016 06:10 IST

वर्षाचे ३६५ दिवस कायम धावपळीत असलेला मुंबईकर लाडक्या श्रीगणेशाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे.

मुंबई : वर्षाचे ३६५ दिवस कायम धावपळीत असलेला मुंबईकर लाडक्या श्रीगणेशाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींपासून घरगुती गणेशमूर्तींच्या स्वागतासाठी मुंबापुरीतला उत्साह ओसंडून वाहत आहे. शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे मुंबापुरीत आनंदलहरी उसळत आहेत.गणरायाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना त्यांच्या उत्साहात कसलीही बाधा येऊ नये, यासाठी ३० हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा मुंबईत तैनात असणार आहे. मिरवणुकांवर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद वस्तू, व्यक्तींबाबत पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी केले आहे. मुंबईतल्या गिरगाव आणि लालबाग-परळसारख्या मराठमोळ्या वस्तीत गणेशोत्सवाची लगबग आधीपासूनच सुरू झाली आहे. दादर, अंधेरीसह घाटकोपरसारख्या मोठ्या बाजारपेठांत खरेदी-विक्रीचा उत्साह ओसंडून वाहत अहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे, नेत्रोद्दीपक रोशणाई आकर्षण ठरत आहे. श्रींच्या नैवेद्यांसाठी मिठाई आणि गोडाधोडाच्या बाजारपेठांतली गर्दी ‘ओव्हरफ्लो’ झाली आहे; तर फुलांच्या मार्केटमध्ये दरवळणाऱ्या सुगंधाने बाप्पाची आरास आणखीच बहारदार झाली आहे. गणेशगल्ली, फोर्ट, गिरगाव, अंधेरी, वांद्रे, दादरसह चेंबूरमधील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बाप्पाच्या सेवेसाठी दहा दिवस स्वत:ला वाहून घेतले आहे. (प्रतिनिधी)