शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचा जयघोष

By admin | Updated: September 6, 2016 00:45 IST

गौरवशाली मिरवणुकीची परंपरा कायम राखत सोमवारी मानाच्या पाच गणपतींचे दिमाखात स्वागत करण्यात आले.

पुणे : गौरवशाली मिरवणुकीची परंपरा कायम राखत सोमवारी मानाच्या पाच गणपतींचे दिमाखात स्वागत करण्यात आले. श्रींची मनमोहक मूर्ती, पारंपरिक पालख्या, फुलांनी सजविलेले आकर्षक रथ, ढोल-ताशांचा गजर अन् गणेशभक्तांच्या उत्साही वातावरणात मानाच्या गणपतींची मिरवणूक काढण्यात आली. शहराचे वैभव असलेल्या मानाच्या पाच गणपतींचे स्वागत या वर्षीही वाजत-गाजत करण्यात आले. दुपारी दीड वाजेपर्यंत पाचही गणपतींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता सुरू झाली. तर, सकाळी ११.३७ वाजता श्रींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने पालखीत श्रींची मिरवणूक काढण्यात आली. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक अश्वरथामध्ये काढण्यात आली. सकाळी दहा वाजता निघालेली मिरवणूक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उत्सव मंडपात पोहोचली. तर, दीडच्या सुमारास श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. विविधरंगी फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथामध्ये मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. श्रींची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होती. सकाळी ११.३० वाजता ही मिरवणूक सुरू झाली होती. दुपारी दीडच्या सुमारास श्रींची प्रतिष्ठापना झाली. मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता झाली. सकाळी साडेनऊ वाजता श्रींची मिरवणूक काढण्यात आली. तुळशीबाग गणपतीची चांदीच्या दागिन्यांनी मढवलेली भव्य मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने पालखीतून काढण्यात आली. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही मिरवणूक सुरू झाली. दुपारी १२ वाजता केसरीवाड्यात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पाचही गणपतींच्या स्वागत मिरवणुकींची ढोल-ताशांच्या वादनाने रंगत वाढविली. गणेशाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. श्रींची मूर्ती, आकर्षक रथ, ढोल-ताशा पथकांची आकर्षक दृश्य टिपण्यासाठी मोबाईल, कॅमेरे सारसावले होते.

कसबा गणपती : पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या पारंपरिक मिरवणुकीला सकाळी साडेआठ वाजता उत्सव मंडपातून सुरुवात झाली. मिरवणूक लोखंडे तालीम येथे आल्यानंतर गजाननमहाराजांची मूर्ती सोबत घेऊन मिरवणूक लक्ष्मी रोड, कुंटे चौक, बुधवार चौक, जिजामाता बाग येथून उत्सव मंडपात आली. पारंपरिक पालखीमध्ये विराजमान झालेली श्रींची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी नाशिकच्या लोकनाथतीर्थ स्वामीमहाराज ट्रस्टचे प्रमुख प्रकाश प्रभुणे यांच्या हस्ते विधिवत करण्यात आली. श्रीराम आणि शिवतेज ढोल-ताशा पथकाने वादन करून भाविकांची मने जिंकली. प्रभात ब्रास बॅन्ड, देवळनकर बंधू यांचे सनई-चौघड्याच्या सुरांनी वातावरण प्रसन्न झाले होते. यंदा मंडळात १२ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कचरा प्रश्नावर जनजागृती करणार व यंदादेखील हौदामध्ये श्रींचे विसर्जन करणार आहे, अशी माहिती अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली.

तांबडी जोगेश्वरी : तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी दहा वाजता प्रारंभ झाला. चांदीच्या रथातून निघालेल्या गणरायाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण रस्त्यावर एकवटले. या वेळी सतीश आढाव यांच्या नगरावादनाने वातावरण प्रसन्न झाले होते. या वेळी बाळासाहेब आढाव यांचा न्यू गंधर्व ब्रास बॅन्ड आणि शिवमुद्र्रा ढोल ताशा पथकाने मिरवणुकीची रंगत वाढविली. लोखंडे तालीम, कुंटे चौक, लक्ष्मी रस्ता, गणपती चौक, जोगेश्वरी मंदिर या मार्गाने मिरवणूक पुढे सरकली. ही मिरवणूक दुपारी दीड वाजता उत्सव मंडपात पोहोचली. त्यानंतर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना गंगोत्री ग्रीन बिल्टचे मकरंद केळकर आणि अपर्णा केळकर यांच्या हस्ते करण्यात आली.

गुरुजी तालीम मंडळ : मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या सुंदर गणशेमूर्तीची सुभाष स्वप्नील सरपाळे यांनी सजवलेल्या विविधरंगी आकर्षक फुलांच्या रथातून वाजत गाजत मिरवणूक सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी निघाली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाने वातावरण भारले होते. रथात श्रींची मूर्ती मनमोहक दिसत होती. मिरवणूक गणपती चौक, लिंबराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक, बुधवार चौक, बेलबाग चौक मार्गे उत्सवमंडपात पोहोचली. जयंत नगरकरांचे सनईवादन, स्वराज बॅन्ड, नादब्रह्म व शिवगर्जना ढोल-ताशा पथक अशा लवाजमासह मिरवणूक उत्सवमंडपात पोहोचली. उद्योपती मणिलाल गड्डा यांच्या हस्ते सपत्नीक १ वाजून तीस मिनिटांनी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले ते स्त्री-शक्तीचा जागर या संकल्पनेतून नादब्रह्म ढोल-ताशा पथकाने महिला पथक मिरवणुकीत सहभागी केले होते.

तुळशीबाग गणपती : मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीची सुरूवात सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी भक्तिमय वातावरणात झाली. गणपती चौक, नगरकर तालीम, अप्पा बळवंत चौक, मजूर अड्डा, सिटी पोस्ट या मार्गे बाप्पाचे मुख्य मंडपात बारा वाजून तीस मिनिटांनी आगमन झाले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, उपाध्यक्ष विनायक कदम यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मिरवणुकीत गजलक्ष्मी ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. तुळशीबाग गणपतीची भव्य देखणी मूर्ती मिरवणुकीचे आकर्षण ठरली. हे दृश्य टिपण्यासाठी मोबाईल, कॅमेरे सरसावले होते.

केसरी वाडा : मानाच्या पाचव्या केसरीवाड्यातील गणपतीची पालखीमधून सकाळी साडेदहा वाजता मिरवणूक सुरू झाली. श्रीराम ढोल पथकाचे वादन, बिडवे बंधूंचे सनई-चौघडा वादन अशा पारंपरिक पद्धतीने रमणबागेपासून केसरीवाड्यामध्ये श्रींचे आगमन झाले. मिरवणूक मार्गाचे अंतर कमी असले, तरी ढोल-ताशा पथकाच्या वादनाने मिरवणुकीची शोभा वाढविली. केसरीवाड्यात आगमन झाल्यावर ११ वाजून ३५ मिनिटांनी अध्यक्ष रोहित टिळक आणि प्रणिती टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी श्रींचे दर्शन घेतले.