शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खंडेरायाच्या रूपात अवतरला बाप्पा

By admin | Updated: July 23, 2014 00:43 IST

अखंड विश्वावर आपल्या कृपादृष्टीने विघA दूर करणारा सर्वाचा लाडका गणराय आता चक्क मल्हारी मरतड खंडेरायाच्या रुपात भक्तांना दर्शन देण्यासाठी प्रकटला आहे.

पेण : अखंड विश्वावर आपल्या कृपादृष्टीने विघA दूर करणारा सर्वाचा लाडका गणराय आता चक्क मल्हारी मरतड खंडेरायाच्या रुपात भक्तांना दर्शन देण्यासाठी प्रकटला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आता कुळाचाराचे दैवत असणा:या खंडेरायाच्या रुपडय़ातील बाप्पाचे दर्शन विलोभनीय असून दूरदर्शनच्या वाहिन्यांवर सुरु असलेल्या ‘जय मल्हार’ मालिकेच्या लोकप्रियतेचा कलाविष्कार यंदाच्या गणोशोत्सवात बाप्पा खंडेरायाच्या रुपात अवतरला असून पेणच्या गणोशमूर्तीकारांनी हा कलाविष्कार यावर्षी गणोशभक्तांना अनोखी गिफ्ट म्हणून मूर्तीकलेतून साकार केला आहे. या नव्या मॉडेल्समुळे खंडेरायाच्या रुपडय़ातील बाप्पाची सध्या क्रेझ वाढली आहे. 
पेणच्या कलानगरीतील कलेच्या दालनात नवनवनीत कलाविष्कार दरवर्षी पाहावयास मिळतात. सध्या झी मराठी वाहिनीवर जय मल्हार ही पौराणिक मालिका लोकप्रिय झाली आहे. या कथेचा आधार घेत यातील कथानायक व महाराष्ट्राचा कुळस्वामी भगवान शंकराचा अवतार असलेल्या खंडेरायाला बाप्पाच्या रुपात साकारण्याचा नवा कलाविष्कार पेणच्या मूर्तीकारांनी घडवून आणला आहे. 
पेणच्या हमरापूर व जोहे येथील कलाग्राममधील मूर्तीकारांनी ही नवी मॉडेलची बाप्पाची मूर्ती घडवून ती यावर्षी बाजारात आणली. या कच्च्यामूर्तीची थेट विक्री थेट पुण्या-मुंबईर्पयत झाली असून दोन फूट उंचीपासून आठ फूट उंचीच्या अशा सहा प्रकारातील मॉडेल घरगुती गणोशोत्सवासह सार्वजनिक मंडळाच्या मोठय़ा डिमांड मिळविण्यापत यांची विक्री होत आहे.  (वार्ताहर)
 
4अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या  गणोशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. गणपतीच्या मूर्ती बनविण्याचे 5क् टक्के काम पूर्ण झाले असून काही मूर्तीचे फक्त रंगरंगोटीचे काम करायचे बाकी आहे. यावर्षी गणोश भक्तांचा  गणोशोत्सव इकोफ्रेंडली करण्याकडे अधिक कल असल्याने शाडूच्या मातीपासून बनविलेल्या मूर्तींची बुकिंग सर्वाधिक होत आहे. गणोश मूर्ती बनविण्याचे काम  वर्षभर सुरू असल्याने आता जवळपास सर्व गणोश मूर्ती तयार झाल्या आहेत. फक्त रंगरंगोटी आणि फिनिशिंगचे काम सुरू असून बाहेरगावी जाणा:या गणोश मूर्तीचे पॅकिंग सुरू आहे. गणोशोत्सवाच्या कालावधीत पाण्याचे  प्रदूषण कमी व्हावे म्हणून हा उत्सव इकोफ्रेंडली करण्याकडे गण्ेाश भक्तांचा अधिक  कल असल्यामुळे सध्या  बाजारात कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती आणि शाडूच्या मातीच्या गणपतींना चांगलीच पसंती आहे.
 
4सध्या पेणच्या अनेक कार्यशाळांमध्ये खंडेरायाच्या 
रुपडय़ातील रंगविलेले आकर्षक गणराय गणोशभक्तांचे आकर्षण ठरले आहे. हौसेला मोल नसते त्यामुळे o्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम म्हणून या गणोशमूर्तीना जरी मोठी किंमत मोजावी लागली तरीही गणोशभक्तांना बाप्पाची ती मूर्ती खरेदी करण्याचा मोह आवरत नाही.
 
4सिंहासनाधिष्ट राजेशाहीथाटात विराजमान झालेला खंडेरायाच्या रुपातील बाप्पा चतुभरूज असून हातात अवजड तलवार, डमरु, एक हात आशीर्वादाचा तर एक ऐटदारपणो गुडघ्यावर ऐटीत ठेवलेला. 
 
4मागे सिंहासनाच्या महिरपीवर त्रिशूळ, सर्प, सिंह या लक्षणासह बाप्पांच्या अलंकारात घंटाची माळ, डोक्यावर पुणोरी पगडी व कपाळावर भंडा:याचा मळवट अशा पिळदार देहयष्टीचा मल्हारी मरतड जय मल्हार खंडेराय बाप्पांच्या अनोख्या रंगसंगतीने भक्तगण मंत्रमुग्ध होणार आहेत.
 
4गणोश भक्तांच्या मागणीनुसार  नैसर्गिक रंग आणि शाडूच्या मातीचा वापर करून मूर्ती बनविण्यात येत आहेत. यावर्षी इकोफ्रेंडली गणोश मूर्तीच्या किमतीत 2क् टक्के वाढ झाली आहे.  बाप्पांच्या मूर्ती ग्राहकांना वेळेवर मिळाव्यात यासाठी नवी मुंबईतील सर्वच कारखान्यांमध्ये गणोश मूूर्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.  नवी मुंबईतील ठिकठिकाणी गणपती विक्रीसाठी स्टॉल उभारण्याचे आणि गणोश मूर्तीचे बुकिंग सुरू आहे. 
 
4 दरावे येथील अनंत कलाभवन येथे तयार करण्यात आलेल्या गणोश मूर्ती परदेशात तसेच मुंबई, पुणो  चिपळूण, पनवेल, सातारा, विदर्भ इत्यादी जिल्हय़ातील गणोश भक्त घेऊन जात असल्याने ऑर्डरच्या मूर्ती तयार करत न्आहे. दीड ते पाच फूट उंचीच्या गणोश मूर्तीची किंमत 16क्क् ते 2क् हजारपयर्ंत आहे. तर  सहा ते दहा फूट उंचीच्या गण्ेाश मूर्तीची किंमत 25 हजार ते 4क् हजार रुपये आहे.
 
4मूर्ती बनविण्यासाठी लागणारी माती ही राजस्थान व गुजरात राज्यातून आणली जाते. यासाठी जवळपास 2क्क् ते 25क् रुपये प्रति 3क् किलोला खर्च येतो.  गणोशमूर्तीच्या रंगकामासाठी प्रामुख्याने नैसर्गिक रंग वापरले जात असून यांच्याही किमतीत वाढ झाली असल्याचे घणसोली येथील मूर्ती कारागीर अनंत कलाभवन  दारावे येथील मूर्ती कारखानदार आणि कारागीर दिलीप भोईर यांनी सांगितले.