शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे

By admin | Updated: July 21, 2016 03:03 IST

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचे वेळेत वाटप करून बँकांनी त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे.

अलिबाग : शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचे वेळेत वाटप करून बँकांनी त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. तसेच ज्या बँका त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, अशा बँकांची माहिती रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया आणि संबंधित बँकांच्या वरिष्ठ स्तरावर कळविण्यात येईल, अशी तंबी रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी जिल्ह्यातील बँक प्रमुखांना दिली आहे, तर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने त्यांना दिलेले उद्दिष्ट त्यांनी वेळेत पूर्ण केल्याबद्दल बँकेचा विशेष गौरव केला आहे.किसान दिनानिमित्त बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रायगड जिल्ह्यातील बँकांच्या वतीने शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या पीक कर्जाच्या धनादेशाचे वाटप जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी तेली-उगले पुढे म्हणाल्या, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी प्रत्येक बँकेला आवश्यक असलेला निधी मंजूर केलेला आहे. हा निधी संबंधित बँकांनी शेतकऱ्यांना वेळेवर वितरीत करावा. यंदाच्या खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी वाटप करायच्या कर्ज उद्दिष्टापैकी ८० टक्के म्हणजे १२५ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप पूर्ण केले असल्याची माहिती रायगड जिल्ह्याची शासन नियुक्त अग्रणी बँक असलेल्या बँक आॅफ इंडियाचे अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक टी. मधुसूदन यांनी सांगितले. यावेळी बँक आॅफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक गिरीष कुमार सिंग, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँक आॅफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक टी. मधुसूदन, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुधाकर रागतवन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी.तरकसे, जिल्हा उपनिबंधक पी.एम.खेडका आदिंसह जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी व निमंत्रित शेतकरी उपस्थित होते. बँकांनी पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे