शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लूट रोखण्याची जबाबदारी बँकांचीही!:दीपाली काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2017 22:44 IST

‘सीसीटीव्ही’सह रखवालदार नियुक्तीच्या आदेशाला कोलदांडा

गेल्या काही वर्षांपासून बँकेतून रोकड काढून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना लुटण्याच्या घटना सांगली शहरात सातत्याने घडत आहेत. अवघ्या काही सेकंदात ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे. चारच दिवसांपूर्वी मिरजेत भरदिवसा बँकेची ३० लाखांची रोकड लुटण्यात आली. याला जबाबदार कोण? गुन्हा घडल्यानंतर पोलिस येताच तपास सुरु करतात. पण गुन्हेगार ज्या बँकांत गुन्हा करण्यासाठी ‘रेकी’ करतात; त्या बँकांनी काय उपाययोजना केल्या आहेत का? अशाप्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार कोण आहेत? या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून काय प्रयत्न सुरु आहेत? ठराविक बँकांच्या परिसरातच अशा घटना घडत असल्याने, बँकांनी काय करायला हवे? याबद्दल सांगली शहर विभागाच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद... प्रश्न : बँकांची रक्कम भरदिवसा लुटली जात असल्याने, याची जबाबदारी कोणाची?उत्तर : बँक, पोस्ट कार्यालय, एटीएम या तीन ठिकाणी प्रामुख्याने ग्राहकांवर ‘वॉच’ ठेवून त्यांच्याकडील रक्कम लुटली जात आहे. या लुटीला संबंधित ग्राहक, बँक, पोस्ट व पोलिस हे चारही घटक जबाबदार आहेत. विशेषत: बँकांची खूप मोठी जबाबदारी आहे. घडलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यास पोलिस समर्थ आहेत. मात्र बँका व ग्राहकांनीही सुरक्षिततेच्यादृष्टीने सतर्क राहिले पाहिजे. प्रश्न : बँकांनी काय करायला हवे? उत्तर : ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावेत, यासाठी बँकेबाहेर, परिसरात व पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. बँकेत रखवालदाराची नियुक्ती आहे. पण बँकेच्या परिसरात आणखी एका रखवालदाराची नेमणूक केली पाहिजे. जेणेकरुन हा रखवालदार बँकेत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली टिपू शकेल. याशिवाय बँकेत ग्राहकांमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. चोरटे हे नेहमी ‘रेकी’ करुनच ग्राहकांना लुटतात. एखादी स्लिप घेऊन ती भरण्याचे ते नाटक करतात. मात्र त्यांचे सर्व लक्ष ग्राहकांकडे असते. चोरटे दिवसातून अनेकदा बँकेत जातात. ही बाब रखवालदार व कर्मचाऱ्याच्या लक्षात आली, तर संशयित चोरट्यास पकडता येऊ शकते. त्यामुळे पुढील गुन्ह्यांना आळा बसविण्यात यश मिळेल. बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना हे उपाय सुचविले आहेत. तरीही त्यांनी याची अंमलबजावणी केलेली नाही. एटीएममध्ये पैसे भरण्यास खासगी कंपन्यांना ठेका दिला जातो. हे ठेकेदार स्थानिक लोकांची नियुक्ती करुन त्यांना पैसे भरण्याचे काम देतात. दररोज लाखो रुपये त्यांच्याकडे दिले जातात. हे खासगी कर्मचारी पैसे भरताना कोणतीही काळजी घेत नाहीत. परिणामी मिरजेसारखी घटना घडते. पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला आहे. यासाठी आता बँकेने एटीएममध्ये पैसे भरण्याची स्वत:चीच यंत्रणा उभी केली पाहिजे.प्रश्न : पोलिस यंत्रणा लुटीच्या गुन्ह्याचा तपास कसा करते?उत्तर : ठराविक बँकांच्या परिसरातच ग्राहकांना लुटले जात आहे. या बँकांबाहेर वेशातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच अशी एखादी घटना घडली, तर गस्ती पथक अवघ्या सात मिनिटात घटनास्थळी दाखल होते. चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी केली जाते. बँकेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास केला जातो. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी केली जाते. बँकेच्या रखवालदाराकडे चौकशी केली जाते. अशाप्रकारे घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना निश्चित यश येईल, असे वाटते. गेल्या तीन महिन्यात ‘चेनस्नॅचिंग’च्या अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे.प्रश्न : ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?उत्तर : बँकेतून दहा हजाराची रक्कम काढायची असली तरी ग्राहकांनी काळजी घ्यावी. मोठी रक्कम काढायची असेल तर त्यांनी सोबत कुणाला तरी घ्यावे. रक्कम ठेवण्यासाठी बॅग घ्यावी. बँकेत एखादी व्यक्ती संशयाने पाहत असल्याचे दिसून आले, तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. आपला कोणी तरी पाठलाग करीत असल्यास, ते लक्षात आले पाहिजे.- सचिन लाड, सांगली